ए.टी झांबरे विद्यालयात विज्ञानाचा जल्लोष; ५६ विद्यार्थ्यांचा गौरव करत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा
1 min read

ए.टी झांबरे विद्यालयात विज्ञानाचा जल्लोष; ५६ विद्यार्थ्यांचा गौरव करत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

Loading

 

ए.टी झांबरे विद्यालयात विज्ञानाचा जल्लोष; ५६ विद्यार्थ्यांचा गौरव करत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

जळगांव प्रतिनिधी
एटी झांबरे माध्यमिक विद्यालयात
राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे मॅडम होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे ज्येष्ठ कृतिशील शिक्षक श्री महेंद्र नेमाडे सर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाचे महत्त्व समजावून सांगत दैनंदिन जीवनातील विज्ञानाच्या उपयोगांविषयी मार्गदर्शन केले.
वर्षभर विज्ञान मंडळांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पोस्टर निर्मिती, प्रतिकृती तयार करणे, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, साखर तक्ता, पोषण फलक, प्रकल्प लेखन आदी उपक्रमांचा समावेश होता. या सर्व स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. त्यापैकी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ५६ विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
तसेच समुदाय रेडिओ केंद्र Manbhavan 90.8 FM वर विज्ञान विषयावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत तीन गट सहभागी झाले होते. इयत्ता सहावी व त्यावरील वर्गातील विद्यार्थ्यांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक-शिक्षिका तसेच प्रयोगशाळा सहाय्यक श्रीमती प्रतिभा नेहेते यांनी विशेष प्रयत्न केले. विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागामुळे व शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे राष्ट्रीय विज्ञान दिनाचा कार्यक्रम अत्यंत यशस्वी व प्रेरणादायी ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *