NMMS 2025 मध्ये कृतीका पवारची यशस्वी झेप; निंभोरा विद्यालयात सत्कार समारंभ उत्साहात!
1 min read

NMMS 2025 मध्ये कृतीका पवारची यशस्वी झेप; निंभोरा विद्यालयात सत्कार समारंभ उत्साहात!

Loading

NMMS 2025 मध्ये कृतीका पवारची यशस्वी झेप; निंभोरा विद्यालयात सत्कार समारंभ उत्साहात!

अमळनेर प्रतिनिधी
निंभोरा येथील माध्यमिक विद्यालय निंभोरा येथील विद्यार्थिनी कृतीका दिनेश पवार हिने NMMS 2025 या शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले आहे. या यशासाठी मार्गदर्शक शिक्षिका प्रतीक्षा रविंद्र पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल विद्यालयाच्या वतीने कृतीका पवार व मार्गदर्शक शिक्षिका प्रतीक्षा पाटील यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या वेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक एन. आर. चौधरी, जेष्ठ शिक्षक के. डी. पाटील, शिक्षक निखिल संदानशिव, लिपिक आकाश चौधरी, शिक्षकेतर कर्मचारी किरण पाटील, संजय वाडेकर तसेच संस्था चालक गजानन चौधरी उपस्थित होते.
कार्यक्रमप्रसंगी संस्था चालक गजानन चौधरी यांनी कृतीका पवार, मार्गदर्शक शिक्षिका प्रतीक्षा पाटील तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.🌹🌹

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *