विटनेरमध्ये शिवजयंतीनिमित्त ११ वी वक्तृत्व स्पर्धा उत्साहात; पंचक्रोशीसाठी ‘शिवसप्ताह’चा संकल्प 
1 min read

विटनेरमध्ये शिवजयंतीनिमित्त ११ वी वक्तृत्व स्पर्धा उत्साहात; पंचक्रोशीसाठी ‘शिवसप्ताह’चा संकल्प 

Loading

विटनेरमध्ये शिवजयंतीनिमित्त ११ वी वक्तृत्व स्पर्धा उत्साहात; पंचक्रोशीसाठी ‘शिवसप्ताह’चा संकल्प

विटनेर (ता.जि. जळगाव) प्रतिनिधी
शिवजयंतीच्या पावन निमित्ताने “श्री छत्रपती शिवराय बहुउद्देशीय मित्रमंडळ, विटनेर” यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ११ वी वक्तृत्व स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या स्पर्धेत सुमारे २० स्पर्धकांनी सहभाग नोंदवत आपली वक्तृत्व कला सादर केली.

छत्रपती शिवरायांच्या विचारांचा जागर आणि तरुण पिढीत आत्मविश्वास निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेला ग्रामस्थांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

🏆 लहान गटातील विजेते:
प्रथम – रोहित शंकर पाटील
द्वितीय – अंकिता किरण लव्हाळे
तृतीय – किर्ती समाधान साबळे

🏆 मोठ्या गटातील विजेते:
प्रथम – शिवानी दिपक नावडे
द्वितीय – वैष्णवी राजपूत
तृतीय – ममता प्रकाश साबळे
उत्तेजनार्थ – प्रतीका प्रमोद सोनवणे

कार्यक्रमाचे समर्पक प्रास्ताविक श्री. नवल परदेशी यांनी केले. तर सूत्रसंचालन श्री. ह.भ.प. संदीप महाराज विटनेरकर यांनी प्रभावी शैलीत करून स्पर्धकांचे मनोबल उंचावले. गोपाल गुंजाळ यांनी आभार प्रदर्शन केले.

स्पर्धेचे परीक्षण व पर्यवेक्षणाची जबाबदारी विटनेर विद्यालयातील आदर्श शिक्षक आदरणीय बाबूलाल राजपूत सर यांनी समर्थपणे पार पाडली. स्पर्धकांची वेशभूषा, बोलीभाषा, आशय मांडणी व वेळेचे नियोजन यांचा बारकाईने विचार करून विजेत्यांची निवड करण्यात आली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भूषण भाऊ, शरद ठोंबरे, योगेश बाविस्कर, आर्मी नितीन राजपूत, दीपक पाटील, पंकज पाटील तसेच मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

गेल्या दहा वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबविला जात असून अनेक विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळाले आहे. त्यातीलच एक सुमित दिपक खैरे यांची भारत सरकार आयोजित १५ व्या छात्र संसदेत National Level “Student Speaker” म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांच्या वडिलांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

तसेच या स्पर्धेतून प्रेरणा घेत किर्ती शंकर पाटील हिने कीर्तन क्षेत्रात प्रगती करत समाजप्रबोधनाचे कार्य सुरू केले आहे. तिच्या उल्लेखनीय वाटचालीबद्दल तिच्या वडिलांचाही सन्मान करण्यात आला.

भविष्यात हा उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबवून पंचक्रोशीतील गावांना सहभागी करून “शिवसप्ताह” आयोजित करण्याचा मंडळाचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *