पुस्तकाबाहेरचे ज्ञान: प्रताप कॉलेज हिंदी विभागाची एकदिवसीय प्रेरणादायी अभ्यासभेट
![]()
पुस्तकाबाहेरचे ज्ञान: प्रताप कॉलेज हिंदी विभागाची एकदिवसीय प्रेरणादायी अभ्यासभेट
अमळनेर प्रतिनिधी
प्रताप महाविद्यालयाच्या हिंदी विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले. या सहलीत सुमारे 11 विद्यार्थी आणि हिंदी विभागप्रमुख प्रो.डॉ. शशिकांत सोनवणे ‘ सावन ‘ , उप प्राचार्या डॉ.कल्पना पाटील, सहा.प्रा.के.पी. बागुल व किशोर सोनवणे असे 4 प्राध्यापक सहभागी झाले होते. सहलीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना ऐतिहासिक, सांस्कृतिक,साहित्यिक व भौगोलिक स्थळांची प्रत्यक्ष माहिती मिळवून देणे हा होता.
विद्यार्थ्यांनी नाशिक येथिल विश्वविख्यात त्रिरश्मी लेण्या, दादासाहेब फाळके स्मारक(चित्र नगरी), तसेच पर्यटन विभाग,महाराष्ट्र शासनाचे गंगापूर धरण या स्थळांना भेट दिली. मा. विभाग प्रमुखांनी या स्थळांचे अंतरराष्ट्रीय ,ऐतिहासिक पर्यावरणीय महत्त्व आणि वैशिष्ट्ये समजावून सांगितली. सहभागी विद्यार्थ्यांनी निरीक्षण नोंदी करून, महत्त्वपूर्ण माहिती संकलित केली.
या सहलीमुळे विद्यार्थ्यांना पुस्तकातील ज्ञानासोबतच प्रत्यक्ष अनुभवही मिळाला. साहित्य,कला , संस्कृती, प्रसार व मनोरंजन माध्यमांची व्याप्ती, तसेच या क्षेत्रा तील रोजगार व नोकरी संबंधित विविध संधी या बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करन्यात आले. सहल प्रमुख म्हणून डॉ. कल्पना पाटील यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. प्र. प्राचार्य एच.डी.जाधव यांनी सांगितले की अशा शैक्षणिक सहली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरतात.
सहलीनंतर सर्व विद्यार्थी सुरक्षितपणे आपल्या परतले आणि त्यांनी आपले अनुभव उत्साहाने व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी ही सहल ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले.

