अमळनेरकरांचा मानाचा शिवजन्मोत्सव जल्लोषात; भव्य शोभायात्रा व रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
![]()
अमळनेरकरांचा मानाचा शिवजन्मोत्सव जल्लोषात; भव्य शोभायात्रा व रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर शहरातील मानाचा शिवजन्मोत्सव यंदाही पारंपरिक पद्धतीने मोठ्या थाटामाटात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच शहरात शिवमय वातावरण निर्माण झाले होते. प्रारंभी पूजन व आरतीचा मान प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आला. प्रांताधिकारी मयूर भंगाळे, डीवायएसपी विनायक कोते व पीआय दत्तात्रय निकम यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले.
यानंतर शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थांनी आकर्षक देखावे सादर केले. छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी राजे यांच्या जीवनावर आधारित पथनाट्याने उपस्थितांची मने जिंकली. जीत स्टुडिओचे सादरीकरण विशेष ठरले. बोहरा स्कूलचे पथनाट्य, न्यू व्हिजन व कन्हैया ग्रुप (रुबजीनगर) यांच्या लाठी-काठीच्या कर्तबगारीने मिरवणुकीत रंगत आणली.
मिरवणूक मार्गावर विजय पाटील (पाटील बिल्डर्स), राज लाड (बिल्डर), आकाश परदेशी, भूषण चौधरी, तुषार बाविस्कर तसेच बालवीर व्यायामशाळा यांच्या वतीने थंड पेय, शरबत, लस्सी व पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले.
आणि खान्देश रक्षक ग्रुप आजी माजी सैनिक अल्पहार वाटप करण्यात आले.
या उत्सवासाठी मा. आ. शिरीषदादा चौधरी, नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, प्रशांत निकम, अमेय मुंदडा, सरजू शेठ, विकी आबा जाधव, भरत लालवाणी, डॉ. अनिल शिंदे, दादा पवार यांचे अनमोल सहकार्य लाभले.
नाट्य मंदिर येथे सामूहिक आरतीने उत्सवाचा समारोप झाला. मा. आ. शिरीषदादा चौधरी, नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, बांधकाम सभापती दादा पवार, पाणीपुरवठा सभापती कैलास तात्या पाटील, मोहन भाऊ सातपुते, सुरज परदेशी, पंकज भोई, नाना धनगर, अॅड. दिनेश पाटील आदी मान्यवरांनी आरतीत सहभाग घेतला. सहभागी शाळकरी मुलामुलींचा ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. मंगळग्रह संस्थेच्या सहकार्यामुळे हा सन्मान सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहात पार पडला.
संपूर्ण मिरवणुकीत अथर्व जाधव, मोहित पाटील, रितेश सैंदाणे, प्रेम पाटील, यश हापसे, राज पाटील (ड्रोन) तसेच खेमचंद सूर्यवंशी (जेपी) यांनी फोटोशूट व ड्रोन व्हिडीओ रील्स तयार करून मोलाचे योगदान दिले. तर रणजित शिंदे यांच्या कडून मुलगा शिवतेज यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व शिवप्रेमी साठी शिवभोजनाची सेवा प्रदान करण्यात आली.सार्वजनिक शिवजयंती समितीच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
दरम्यान, समाजकार्यामध्ये अग्रेसर असलेल्या युवा मित्र परिवाराने शिवजन्मोत्सवानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले. हजारो रुग्णांना रक्तदानाच्या माध्यमातून मदत करणाऱ्या या परिवाराच्या कार्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
एकूणच, अमळनेरकरांनी एकोप्याने व उत्साहात साजरा केलेला शिवजन्मोत्सव सामाजिक ऐक्य आणि शिवविचारांचा संदेश देणारा ठरला.

