गांधली येथे शेतकरी सहायता कार्यशाळा
![]()
गांधली येथे शेतकरी सहायता
कार्यशाळा
अमळनेर प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आजीवन अध्ययन व विस्तार शिक्षण विभाग जळगाव आणि श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटी अमळनेर संचलित समाजकार्य महाविद्यालय यांच्यावतीने संयुक्त विद्यमाने शेतकरी कार्यशाळा शेतकरी सहाय्यता कार्यशाळा संपन्न झाली .
सदर कार्यशाळेचे उद्घाटन समारंभ अध्यक्ष अभिजीत सुभाष भांडारकर ,उद्घाटक सरपंच नरेंद्र शिवाजीराव पाटील,प्राचार्य डॉ. पी एस पाटील यांच्या सह मान्यवर साधन व्यक्ती यांच्या उपस्थितीत पार पडले.
शेतकरी सहाय्यता कार्यशाळा गांधली येथे उपस्थित शेतकरी बांधव यांना विद्यापीठ सिनेट सदस्य प्रा डॉ धीरज वैष्णव, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे प्रवीण पाटील, राष्ट्र विकास संस्था अमळनेर सचिव तुषार पाटील, आधार संस्था अध्यक्ष डॉ भारती पाटील यांनी मार्गदर्शन केले. समारोप मनोगत प्राचार्य डॉ पी एस पाटील यांनी व्यक्त केले.
गावातील प्रतिष्ठित नागरिक प्रगतशील शेतकरी धनंजय कुलकर्णी ,सुधाकर साळुंखे, माजी पोलीस पाटील प्रताप वामन संदानशिव,एम. जी. पाटील, युवराज पाटील यांचेसह शंभरहून अधिक शेतकरी यांनी सहभागी झाले होते.
कार्यशाळा समन्वयक प्रा डॉ सागरराज चव्हाण, विभाग प्रमुख डॉ जगदीश सोनवणे, प्रा डॉ अनिता खेडकर, प्रा धनराज ढगे, प्रा विजयकुमार वाघमारे, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक यांनी सहभाग नोंदवला.
कार्यशाळा सूत्रसंचालन प्रा डॉ भरत खंडागळे यांनी केले तर आभार समन्वयक प्रा डॉ सागरराज चव्हाण यांनी मानले.

