फार्मसी महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी
1 min read

फार्मसी महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी

Loading

फार्मसी महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी

अमळनेर प्रतिनिधी

खान्देश शिक्षण मंडळ संचलित स्व. पंढरिनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी.फार्मासी व स्व. प्रा. र. का. केले कॉलेज ऑफ बी.फार्मासी या महाविद्यालयामध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती’ मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने संपूर्ण महाविद्यालय परिसर दुमदूमून गेला होता.
​कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. रविन्द्र सोनवणे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
​याप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. रविन्द्र सोनवणे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे प्रेरणास्थान आहेत. त्यांचे गडकिल्ल्यांचे व्यवस्थापन, शिस्त आणि रयतेच्या कल्याणाचा विचार विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात अंगीकारणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
​या सोहळ्यासाठी महाविद्यालयाचे प्रा.अनिल बोरसे, प्रा.देवेश भावसार, प्रा.स्वप्नाली महाजन, प्रा. गीतांजली पाटील, प्रा. प्रगती पाटील, प्रा. प्रियंका महाजन, प्रा. शिवानी शर्मा, प्रा. मानसी उपासनी, प्रा. वैशाली कुलकर्णी व श्री.ज्ञानेश्वर चौधरी,श्री. अनिल महाजन, श्री.जितेंद्र पाटील, श्री. पंकज पवार , श्री. महेश सोनजे, श्री. प्रशांत चौधरी, श्री.प्रकाश पाटील, श्री.कैलास कड, श्री.किशोर बुलके व श्री यश शिंपी कार्यक्रमास उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *