धरणगाव सायकलिस्ट ग्रुप कडून छ.शिवरायांना अभिवादन !  १९ फेब्रुवारी ला १९ किलोमीटर सायकल राईड करून दिली मानवंदना !
1 min read

धरणगाव सायकलिस्ट ग्रुप कडून छ.शिवरायांना अभिवादन ! १९ फेब्रुवारी ला १९ किलोमीटर सायकल राईड करून दिली मानवंदना !

Loading

धरणगाव सायकलिस्ट ग्रुप कडून छ.शिवरायांना अभिवादन !

१९ फेब्रुवारी ला १९ किलोमीटर सायकल राईड करून दिली मानवंदना !

धरणगाव प्रतिनिधी : पी डी पाटील सर

धरणगांव – संपूर्ण जगामध्ये शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. धरणगाव शहरात सर्वोत्तम कल्याणकारी राजा, कुळवाडीभूषण, बहुजन प्रतिपालक, छत्रपती शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने धरणगाव सायकलिष्ट ग्रुपने १९ फेब्रुवारी १९ किलोमीटर धरणगाव ते पिंप्री सोबत राईड करुन परत धरणगाव येऊन छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी सायकलिस्ट एरंडोल कॉलेजचे प्रा.डॉ.योगेश सूर्यवंशी, पाळधी येथील काँग्रेसचे नेते डॉ.व्ही डी पाटील, महात्मा फुले हायस्कूलचे उपशिक्षक एस एन कोळी , शामखेडे जि प शाळेचे मुख्याध्यापक कैलास पवार, सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार पी डी पाटील उपस्थित होते.
सायकलिंग करणे,व्यायाम करणे, योगा करणे ,चालणे , रनिंग करणे हे व्यायाम प्रकार सर्वांनी केले पाहिजे यातून आपले शरीर तंदुरुस्त व निरोगी राहते. हा संकल्प धरणगाव सायकलिस्ट ग्रुपने केला आहे आणि आज शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने ही उत्साहपूर्ण सायकल राईड सोबत केली याचा मनस्वी आनंद आहे असे प्रतिपादन सायकलिस्ट ग्रुपचे एस आर डॉ.योगेश सूर्यवंशी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *