विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची लंडनमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला भेट; बाबासाहेबांच्या स्मृतीला केले वंदन.*
1 min read

विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची लंडनमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला भेट; बाबासाहेबांच्या स्मृतीला केले वंदन.*

Loading

*विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची लंडनमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला भेट; बाबासाहेबांच्या स्मृतीला केले वंदन.*

पुणे. ( विशेष प्रतिनिधी उदय नरे ) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या सध्या १५ ते २१ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत महाराष्ट्र विधिमंडळाच्या माननीय पीठासीन अधिकाऱ्यांच्या ईंग्लड अभ्यास दौऱ्यावर असून, या दौऱ्यादरम्यान त्यांनी आज लंडन येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला भेट दिली.

भेटीदरम्यान डॉ. गोऱ्हे यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिल्पाला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या पवित्र स्मृतीला वंदन केले. तसेच केंद्र सरकारच्या नेहरू सेंटरचे श्री. रवींद्रचंद्रन यांनी डॉ. नीलम गोऱ्हे यांचा सत्कार केला. यावेळी, लंडन महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष वृषाल खांडके, वैभव खांडगे , केंद्र सरकारच्या नेहरू सेंटरचे श्री. रवींद्रचंद्रन, स्मारक व्यवस्थापक श्री. फहद, उद्योजिका अनुश्री चौगुले उपस्थित होते.

डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, बाबासाहेबांनी हिवाळ्यात हिटर नसतानाही कडाक्याच्या थंडीत विद्या अभ्यास करून शिक्षण पूर्ण केले. महाराष्ट्र शासनाने या निवासस्थानाला शासकीय दर्जा दिला असून, येथील व्यवस्था शासनाच्या तर्फे उत्तम राखली जात आहे. तरीही स्मारकाची देखभाल, सुशोभीकरण अधिक समृद्ध करण्यासाठी आणि येथील कर्मचारी वर्गास मान्यता देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.या स्मारकाकडे ना. देवेंद्र फडणवीस , ना.एकनाथ शिंदे , समाजकल्याण मंत्री ना.संजय शिरसाट , व केंद्रीय समाज कल्याण मंत्री खा.रामदास आठवले ,निवृत्त सरन्यायाधीश मा.भुषण गवई यांचे सतत लक्ष असल्याचे नीलमताई गोर्हे यांनी अधोरेखित केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (LSE) मध्ये शिक्षण घेत असताना १९२१-२२ या काळात ज्या घरात वास्तव्य केले होते, ते घर आता ‘डॅा. बाबासाहेब आंबेडकर हाऊस’ म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्र शासनाने २०१५ मध्ये हे घर खरेदी करून स्मारकात रूपांतरित केले आहे. हे स्मारक किंग हेन्रीज रोड, कॅम्डन, लंडन येथे आहे. येथे बाबासाहेबांच्या जीवनातील छायाचित्रे, काही वैयक्तिक वस्तू आणि त्यांच्या कार्याचे प्रदर्शन आहे.

या भेटीमुळे बाबासाहेबांच्या आंतरराष्ट्रीय वारशाची ओळख पुन्हा ठळक झाली आहे. डॉ. गोऱ्हे यांनी डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकाचे महत्व अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *