स्मार्टफोन फ्री बालपणासाठी जागतिक लढा; डॉ. रेखा चौधरी यांची डिजिटल डिटॉक्स चळवळ ७८ देशांत पोहोचली”,  सोळा वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदीची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल
1 min read

स्मार्टफोन फ्री बालपणासाठी जागतिक लढा; डॉ. रेखा चौधरी यांची डिजिटल डिटॉक्स चळवळ ७८ देशांत पोहोचली”, सोळा वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदीची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

Loading

“स्मार्टफोन फ्री बालपणासाठी जागतिक लढा; डॉ. रेखा चौधरी यांची डिजिटल डिटॉक्स चळवळ ७८ देशांत पोहोचली”

सोळा वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदीची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
डिजिटल युगात वाढत्या स्क्रीन वापरामुळे मुलांच्या मानसिक, शारीरिक आणि सामाजिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. अशा पार्श्वभूमीवर ‘वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे’च्या संस्थापक डॉ. रेखा चौधरी गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने जनजागृतीचे कार्य करत आहेत. स्मार्टफोन फ्री बालपण, डिजिटल डिटॉक्स, डिजिटल फास्टिंग आणि संतुलित तंत्रज्ञान वापर या संकल्पना त्यांनी केवळ मांडल्या नाहीत, तर त्या प्रत्यक्षात रुजवण्यासाठी देशभर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापक चळवळ उभारली आहे.
महाराष्ट्रातून सुरू झालेला हा उपक्रम आज तब्बल ७८ देशांपर्यंत पोहोचला असून, डिजिटल वेलनेसच्या दिशेने एक जागतिक आंदोलन म्हणून ओळखला जात आहे. डॉ. चौधरी यांनी ‘Digital Detox Wala Gaav’ सारख्या अभिनव संकल्पनांद्वारे गावागावांत दररोज ठराविक वेळ डिजिटल विश्रांती घेण्याची सवय निर्माण करण्यावर भर दिला आहे. या उपक्रमामुळे कुटुंबांमध्ये संवाद वाढत असून, मुलांमध्ये सर्जनशीलता आणि सामाजिक सहभागात सकारात्मक बदल दिसून येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
शाळांमध्ये ‘स्मार्टफोन फ्री शिक्षण’ या संकल्पनेचा प्रचार करताना त्यांनी पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. त्यांच्या मते, डिजिटल वेलनेस हा केवळ वैयक्तिक पातळीवरील विषय नसून तो समाज, शिक्षण व्यवस्था आणि धोरणात्मक निर्णयांच्या पातळीवर गांभीर्याने चर्चिला जाणे आवश्यक आहे.
विशेष म्हणजे, सोळा वर्षांखालील मुलांना सोशल मीडियापासून दूर ठेवण्यासाठी कायदेशीर उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी आपल्या याचिकेत केली असून, याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. सरकारने यावर ठोस आणि तातडीचा निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
या संपूर्ण चळवळीमागील विचार, अनुभव आणि पुढील दिशा समजून घेण्यासाठी डॉ. रेखा चौधरी यांनी शेअर केलेला माहितीपूर्ण व्हिडिओ पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. डिजिटल संतुलनाचा संदेश देणारी ही चळवळ मुलांच्या उज्ज्वल आणि निरोगी भविष्यासाठी एक सकारात्मक पाऊल ठरत आहे असे
‘वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे’च्या संस्थापक डॉ. रेखा चौधरी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *