जिल्हा प्रशासनातर्फे शिवजयंती उत्सवाचे भव्य आयोजन* *18 ते 20 फेब्रुवारीदरम्यान शिवजयंती सोहळा; पोवाडा, मिरवणूक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल*
1 min read

जिल्हा प्रशासनातर्फे शिवजयंती उत्सवाचे भव्य आयोजन* *18 ते 20 फेब्रुवारीदरम्यान शिवजयंती सोहळा; पोवाडा, मिरवणूक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल*

Loading

*जिल्हा प्रशासनातर्फे शिवजयंती उत्सवाचे भव्य आयोजन*
*18 ते 20 फेब्रुवारीदरम्यान शिवजयंती सोहळा; पोवाडा, मिरवणूक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल*

 

जळगाव, दि. 17 फेब्रुवारी (जिमाका) – जळगाव जिल्हा प्रशासन व सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दि. 18 ते 20 फेब्रुवारी 2026 या कालावधीत जिल्हास्तरीय भव्य शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात शिवजयंती पूर्वतयारी संदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला प्र. निवासी उपजिल्हाधिकारी मनोज चौधरी, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे समन्वयक शंभू पाटील, विनोद ढगे,विविध संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
विविध ऐतिहासिक, सांस्कृतिक व देशभक्तिपर कार्यक्रमांच्या माध्यमातून शिवचरित्राचे स्मरण आणि नव्या पिढीला प्रेरणा देणे हा या उत्सवाचा उद्देश आहे
यात 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 8.00 ते 12.00 या वेळेत छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह शेजारील मैदानावर गडकिल्ले तयार करण्याची स्पर्धा होणार आहे . त्याच दिवशी सकाळी 9.00 ते 12.00 वाजता भाऊचे उद्यान, काव्य रत्नावली चौक येथे चित्रकला व रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. निवडलेल्या उत्कृष्ट चित्रांचे प्रदर्शन दि. 19 फेब्रुवारी रोजी भरविण्यात येणार आहे.
दि. 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 8.00 वाजता छत्रपती शिवाजी महाराजा स्टेडिअम पासून ते शिवाजी पुतळयापर्यंत मिरवणूक काढण्यात येणार असून विद्यार्थी , एनसीसी विद्यार्थी, शिवप्रेमी , नागरिक मोठ्या संख्येने यात सहभागी होणार आहेत. सहभागींसाठी चहा-नाश्ता व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच लोकप्रतिनिधी, अधिकारी व मान्यवरांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. तर संध्याकाळी 5.00 ते 8.00 या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत.
दि. 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.00 ते 10.00 या वेळेत शौर्यगाथांवर आधारित पोवाडा कार्यक्रम होणार असून संध्याकाळी 7.00 वाजता छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह येथे प्रसिद्ध शाहीर रामानंद उगले यांचा “शाहिरी शिवदर्शन” हा विशेष पोवाडे व लोकगीतांचा कार्यक्रम सादर होणार आहे. या कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथा, स्वराज्य स्थापनेचा इतिहास आणि प्रेरणादायी प्रसंग शाहिरी शैलीतून सादर करण्यात येणार आहेत.
शिवजयंती उत्सव शांततेत व उत्साहात पार पाडण्यासाठी सर्व विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *