हक्काच्या लढ्यासोबत भावनिक सहभाग हेच लोकस्वातंत्र्यंचं खर यश….संजय एम.देशमुख*  *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा मुंबई मेळावा.रोगमुक्ती आणि आनापान साधनेवर मार्गदर्शन,नियुक्तीपत्र वितरण*  *आगामी महिला दिनानिमित्त सुषमा ढोले यांना अध्यक्षपद….लोकस्वातंत्र्य वर्धापन दिन साजरा*
1 min read

हक्काच्या लढ्यासोबत भावनिक सहभाग हेच लोकस्वातंत्र्यंचं खर यश….संजय एम.देशमुख* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा मुंबई मेळावा.रोगमुक्ती आणि आनापान साधनेवर मार्गदर्शन,नियुक्तीपत्र वितरण* *आगामी महिला दिनानिमित्त सुषमा ढोले यांना अध्यक्षपद….लोकस्वातंत्र्य वर्धापन दिन साजरा*

Loading

*हक्काच्या लढ्यासोबत भावनिक सहभाग हेच लोकस्वातंत्र्यंचं खर यश….संजय एम.देशमुख*

*लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा मुंबई मेळावा.रोगमुक्ती आणि आनापान साधनेवर मार्गदर्शन,नियुक्तीपत्र वितरण*

*आगामी महिला दिनानिमित्त सुषमा ढोले यांना अध्यक्षपद….लोकस्वातंत्र्य वर्धापन दिन साजरा*

 

अकोला प्रतिनिधी

– संघटना हे आपलं अधिष्ठाण,आपला आत्मा समजून सामाजिक लढ्यातून समस्यामुक्ती साधत आपणास अनंत लोकांसोबत जोडून ठेवत विकासाच्या संधी देणारं प्रभावी माध्यम ही आपल्या संघटनेची ओळख जतन केली पाहिजे.ती ईतर पत्रकार आणि समाजामध्ये पसरवली पाहिजे.आपण समता आणि मानवतावादाच्या दिशेने कशा प्रकारे काम करीत आहोत हे पटवून देत पत्रकार आणि समाजस्नेहींच्या सुख दु:खात संवेदना प्रगट करणे हेच मजबूत मानवी शृंखला निर्मितीचं मोठं रहस्य आहे.असे प्रतिपादन लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख यांनी केले.लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा मुंबई -कोकण विभागाचा ११ वा मासिक विचारमंथन मेळावा मुंबईत टिळक भवन,प्रभादेवी येथे संपन्न झाला.त्यावेळी ते बोलत होते.आगामी मार्चमधील महिलादिनाच्या औचित्त्याने मुंबई प्रदेश पत्रकार महिला आघाडी प्रमुख सौ.सुषमा ढोले- ठाकूर या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी होत्या. त्यांनी अध्यक्षिय भाषणातून ,पुष्पराज गावंडे,गजानन नागे यांनीही लोकस्वातंत्र्यची वाटचाल आणि अभिनव उपक्रमाबाबत मनोगते व्यक्त केली.

याप्रसंगी आनापान साधना मार्गदर्शक , सेवानिवृत्त मंत्रालयीन सहसचिव गजानन वाघ,डॉ.हेमांगी व डॉ.भरत सोलंकी,विदर्भ वैभव मंदिरचे सरचिटणीस गजानन नागे, लोकस्वातंत्र्य राष्ट्रीय पदाधिकारी,कादंबरीकार पुष्पराज गावंडे यांची विचारमंचावर प्रमुख उपस्थिती होती.सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी संत गाडगे बाबा यांना वंदन -अभिवादन करण्यात आले.देशातील शहिद जवान,आत्महत्त्याग्रस्त शेतकरी व अत्त्याचारग्रस्त महिला बळी,दिवंगत पत्रकार तथा अपघात आपत्तीग्रस्त बळींना यावेळी श्रध्दांजली अर्पण करण्यात आली‌.

याप्रसंगी प्रचारक-मार्दर्शक गजानन वाघ यांनी रोगमुक्तीसाठी सुयोग्य जीवनशैली सांगणाऱ्या आनापान साधनेवरील मार्गदर्शन केले.तर निमंत्रित डॉ.भरत व सौ.हेमांगी सोलंकी यांना रक्तदाब,बि.पी सह अनेक व्याधींवरील व हेमांगी सोलंकी महिलांच्या समस्या आणि ब्युटीपार्लरशिवाय नैसर्गिक सौंदर्य कसं वाढवता येईल यावर मार्गदर्शन केले.यावेळी अतिथींचे सत्कार करण्यात आले.लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ५ नव्या वर्धापन दिनिनिमित्त कोकण प्रभारी जगदिशप्रसाद करोतिया व ज्ञानेन्द्रकुमार पांडेय यांनी अध्यक्ष संजय देशमुख व पदाधिकारी गजानन नागे यांचा शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान केला.नवनियुक्त सभासदांना यावेळीओळखपत्रांचे वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमाला कोकण प्रभारी जगदिशप्रसाद करोतिया,ज्ञानेन्द्रकुमार पांडेय ठाणे संघटनप्रमुख संजय सोळंके,अग्रगण्य पत्रकार अनिल चासकर कोकण व मुंबई प्रदेश संघटक विनोद चाळके,कमलेश कुबल,(सांताक्रूज)उमेश चौधरी,(ठाणे)विकास भोसले(चेंबूर)जबिना शेख,(कल्याण) प्रभाकर खरात(महाराष्ट्र न्यूज चॅनल,डोंबिवली) भानु जाधव,दिलीप चव्हाण (उल्हासनगर)अनेक पत्रकार उपस्थित होते.
संचलन विकास भोसले यांनी तर आभारप्रदर्शन उमेश चौधरी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *