पत्रकारांनी अनाचार व सामाजिक अडचणी निर्भयतेने मांडल्या पाहिजेत- श्रीरंग पिंजरकर  लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा ६० विचारमंथन मेळाव्यात लोकस्वातंत्र्य सामाजिक सेवा जीवन गौरव व राष्ट्रसेवा जीवनगौरव पुरस्कार ! श्रीरंगदादांच्या कार्याचा गौरव.  विविध बळी,स्व.डी.वाय‌.पाटील व पत्रकार कुंदन जाधव यांना श्रध्दांजली !  पत्रकार मनोज भगत,श्रीकृष्ण माळी‌व कलावंत समिती अध्यक्ष विठ्ठल खापरकर महाराज सन्मानित
1 min read

पत्रकारांनी अनाचार व सामाजिक अडचणी निर्भयतेने मांडल्या पाहिजेत- श्रीरंग पिंजरकर लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा ६० विचारमंथन मेळाव्यात लोकस्वातंत्र्य सामाजिक सेवा जीवन गौरव व राष्ट्रसेवा जीवनगौरव पुरस्कार ! श्रीरंगदादांच्या कार्याचा गौरव. विविध बळी,स्व.डी.वाय‌.पाटील व पत्रकार कुंदन जाधव यांना श्रध्दांजली ! पत्रकार मनोज भगत,श्रीकृष्ण माळी‌व कलावंत समिती अध्यक्ष विठ्ठल खापरकर महाराज सन्मानित

Loading

पत्रकारांनी अनाचार व सामाजिक अडचणी निर्भयतेने मांडल्या पाहिजेत-
श्रीरंग पिंजरकर

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा ६० विचारमंथन मेळाव्यात लोकस्वातंत्र्य सामाजिक सेवा जीवन गौरव व राष्ट्रसेवा जीवनगौरव पुरस्कार ! श्रीरंगदादांच्या कार्याचा गौरव.

विविध बळी,स्व.डी.वाय‌.पाटील व पत्रकार कुंदन जाधव यांना श्रध्दांजली !

पत्रकार मनोज भगत,श्रीकृष्ण माळी‌व कलावंत समिती अध्यक्ष विठ्ठल खापरकर महाराज सन्मानित

अकोला प्रतिनिधी
सामाजिक जीवनामध्ये वर्तमानात निर्माण झालेल्या अडचणी,बेरोजगारी,आणि अनाचाराविरूध्द पत्रकारांनी निर्भयपणे बोललं पाहिजे,महिला अत्त्याचार,शेतकरी व सर्वसामान्यांच्या ज्वलंत वेदना लेखणीतून मांडल्या पाहिजेत.तरच उद्याचा उद्याचा सुखी,समाधानी विकसित भारत आपण पाहू शकू.असे वास्तवतावादी प्रतिपादन माजी उपमहापौर आणि शिवसेनेचे ज्येष्ठ माजी अकोला जिल्हा प्रमुख श्रीरंग दादा पिंजरकर यांनी केले.लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेच्या ६० व्या मासिक विचारमंथन मेळाव्यात ते अध्यक्षिय मनोगतातून बोलत होते.अकोला महानगराचा विकास आणि पारदर्शक कारभार तथा महाविद्यालयीन जीवनापासून शिवसेनेची बांधणी करणारे, आणि १८ वर्षाच्या दिर्घकाळात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पद भुषविणारे अकोल्यातील प्रथम ज्येष्ठ शिवसेना नेते म्हणून त्यांच्या झंझावती कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला,व त्यांना लोकस्वातंत्र्यकडून उत्स्फूर्तपणे सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी नांदखेडच्या विठ्ठल नागरी पतसंस्थेचे संस्थापक देवीदास म्हैसने, उद्योजक, समाजसेवक शामबाप्पू देशमुख, अकोट,शिवसेना महानगर उपजिल्हा प्रमुख योगेश अग्रवाल,साहेबराव तायडे,हे प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना पदाधिकारी गोपाल म्हैसने व लोकस्वातंत्र्य संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख,अॕड देवानंद वाकळे व अॕड.अर्जून रेंगे परभणी यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी लोकस्वातंत्र्यच्या नव्या सभासदांना आय कार्ड चे वाटप करण्यात आले.उपाध्यक्ष प्रदिप खाडे यांनी अतिथींचा कार्य गौरव सादर केला.

सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,कर्मयोगी संत गाडगे बाबा व महापुरूषांना वंदन-अभिवादन करण्यात आले.देशातील शहिद जवान,नेपाळमधील पूरग्रस्त बळी,महिला,शेतकरी,अपघात व आपत्तीग्रस्त बळींना,तथा पद्मश्री,शिक्षणमहर्षी,माजी राज्यपाल स्व.डी.वाय‌.पाटील व अकोल्यातील न्यूज-१८ चे पत्रकार स्व.कुंदन जाधव व ईतर दिवंगत पत्रकारांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.जिल्हाध्यक्ष पंजाबराव वर यांनी कुंदन जाधव यांचेवर श्रध्दांजलीपर शोकगीत सादर केले. आपल्या भाषणात पुढे बोलतांना पिंजरकर यांनी महाराष्ट्र आणि ६ राज्यात पोहचून पत्रकार आणि सामाजिक कल्याणाचे अभिनव कार्य करणाऱ्या संघटनेचे अभिनव रूप पहायला तर मिळालंच, परंतू कार्यक्रमात आल्यानंतर वाटचालीतील नाविण्य पण लक्षात आलं.अशा शब्दांत गौरव करून वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या‌.याप्रसंगी नांदखेडच्या विठ्ठल नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक देवीदास म्हैसने यांना “लोकस्वातंत्र्य सामाजिक सेवा जीवन गोरव तर तुलंगा येथील भारतमाता समता शिल्प प्रदर्शनीकार साहेबराव तायडे यांना” राष्ट्रसेवा जीवन गौरव पुरस्काराने व उपस्थित अतिथींनाही सन्मानित करण्यात आले.सर्व अतिथींनी व सचिव राजेंद्र देशमुख समयोचित मनोगते व व्यक्त करून पत्रकार महासंघाच्या अभिनव उपक्रमांचा गौरव करून शुभेच्छा व्यक्त केल्या.यावेळी दिव्यांग पत्रकार मनोज भगत हिवरखेड यांनी लोकस्वातंत्र्य प्रभावी पत्रकारिता गौरव पुरस्काराने तर पत्रकार श्रीकृष्ण माळी यांना केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन कडून प्राप्त देशातील व्दितीय पुरस्काराच्या बहूमानाबध्दल सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रदिप खाडे,सचिव राजेंद्र देशमुख,अंबादास तल्हार,पुष्पराज गावंडे,सिध्देश्वर देशमुख,जगदिश अग्रवाल (खामगाव)प्रा.विजय काटे,डॉ.विनय दांदळे,निशाली बाहेकर,संतोष धरमकर,के.व्ही.देशमुख सर,जानकीराम वाकोडे,विठ्ठल महाराज खापरकर,वसंतराव देशमुख,जिल्हाध्यक्ष पंजाबराव वर,सागर लोडम,दिपाली बाहेकर, अॕड लक्ष्मीकांत अंबारखाने,श्रीकृष्ण माळी,सतिश देशमुख,गंगाधर सावळे,सागर दनोरीकर,अजय वानखडे,अर्जूनराव घुगे,गजानन मुऱ्हे,मनोहर मोहोड,बुढन गाडेकर,रमेश समुद्रे,अमित इंगळे,नरेंद्र देशमुख,एजाज खान,दिपक शिरसाट, गजाननराव देशमुख,मनोज भगत,सुरेश तिडके,देवीदास घोरळ,नितीन लोडम,कैलास टकोरे,प्रताप नागरे व करण धोंगडे,वाशिम,प्रेमराज शर्मा, मुर्तिजापूर,गजानन थोरात,विजयराव बाहकर, नागोराव मोहोड,आत्माराम शेळके,राजाभाऊ देशमुख,रविंद्र देशमुख,एकनाथ पाखरे,अनिल केळकर, डॉ.मनोहर घुगे, डॉ.अशोक शिरसाट, डॉ‌.गौरव देशमुख,अॕड संकेत देशमुख,शिवचरण डोंगरे,मोहन जामनिक,अमन तळोकार,सतिश गोपनारायण, व अनेक पत्रकार उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचलन पंजाबराव वर व सौ.दिपाली बाहेकर यांनी तर वऱ्हाडी शैलीतील विनोदी आभारप्रर्शन राष्ट्रीय पदाधिकारी,कादंबरीकार पुष्पराज गावंडे यांनी केले.स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.


=

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *