वाढदिवसानिमित्त पुस्तकदान व वृक्षारोपणाचा प्रेरणादायी उपक्रम सामाजिक कार्यकर्ते भूषण कोळी यांचा समाजाभिमुख संदेश; ५५ बालसंस्कार पुस्तके विद्यार्थ्यांना भेट
1 min read

वाढदिवसानिमित्त पुस्तकदान व वृक्षारोपणाचा प्रेरणादायी उपक्रम सामाजिक कार्यकर्ते भूषण कोळी यांचा समाजाभिमुख संदेश; ५५ बालसंस्कार पुस्तके विद्यार्थ्यांना भेट

Loading

 वाढदिवसानिमित्त पुस्तकदान व वृक्षारोपणाचा प्रेरणादायी उपक्रम

सामाजिक कार्यकर्ते भूषण कोळी यांचा समाजाभिमुख संदेश; ५५ बालसंस्कार पुस्तके विद्यार्थ्यांना भेट

अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर तालुक्यातील हिंगोणा खु. प्र.ज. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गुरुवार, दि. १२ फेब्रुवारी रोजी सामाजिक कार्यकर्ते भूषण गोपीचंद कोळी यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम उत्साहात पार पडला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना एकूण ५५ बालसंस्कार व प्रेरणादायी पुस्तके भेट स्वरूपात वितरित करण्यात आली. ज्ञानदानासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत शाळा परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले.

वाढदिवस हा केवळ आनंद साजरा करण्याचा दिवस न ठरता, समाजाला काहीतरी देण्याची संधी असावी, या भावनेतून भूषण कोळी यांनी हा उपक्रम राबविला. विद्यार्थ्यांच्या हातात चांगल्या संस्कारांची आणि प्रेरणेची पुस्तके देऊन त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळावी, हा त्यामागील उद्देश असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

भूषण कोळी हे गेल्या अनेक वर्षांपासून समाजहितासाठी विविध उपक्रमांत सक्रिय आहेत. रक्तदान शिबिरे, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, पर्यावरण संवर्धन मोहिमा तसेच सामाजिक जनजागृतीच्या कार्यक्रमांद्वारे ते सातत्याने समाजाचे ऋण फेडण्याचे कार्य करीत आहेत. त्यांच्या या कार्याचा गौरव उपस्थितांनी केला.

या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक गजानन पाटील, शिक्षक अजय कोळी, मनिषा पाटील, गावातील सहकारी योगेश भोई तसेच राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक सागर कोळी उपस्थित होते. मुख्याध्यापकांनी भूषण कोळी यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत विद्यार्थ्यांना अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचा आदर्श घेण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी लावलेल्या वृक्षांचे जतन व संगोपन करण्याचा संकल्प केला. वाढदिवसाच्या निमित्ताने समाजोपयोगी उपक्रम राबविण्याची ही परंपरा इतरांसाठीही प्रेरणादायी ठरावी, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *