पदवीधर आमदार निधीतून १० शाळांना ‘आहुजा’ पोडीयम संच; एरंडोल तालुक्यात शैक्षणिक सुविधांना बळ
1 min read

पदवीधर आमदार निधीतून १० शाळांना ‘आहुजा’ पोडीयम संच; एरंडोल तालुक्यात शैक्षणिक सुविधांना बळ

Loading

  पदवीधर आमदार निधीतून १० शाळांना ‘आहुजा’ पोडीयम संच; एरंडोल तालुक्यात शैक्षणिक सुविधांना बळ

एरंडोल प्रतिनिधी :
एरंडोल तालुक्यातील शिक्षण क्षेत्राला बळकटी देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम आज पार पडला. नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचे युवा आमदार आदरणीय सत्यजित दादा तांबे साहेब यांच्या सन २०२५-२०२६ च्या स्थानिक विकास निधीतून तालुक्यातील १० शाळांना ‘आहुजा’ कंपनीचे पोडीयम संच वितरित करण्यात आले.

या उपक्रमामुळे शाळांमधील शैक्षणिक, सांस्कृतिक व विविध उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविता येणार असून शिक्षक व विद्यार्थ्यांना आधुनिक ध्वनीव्यवस्थेची सुविधा उपलब्ध झाली आहे.

यावेळी शहजादी उर्दू प्राथमिक शाळा, कासोदा येथील मुख्याध्यापक इस्तीयाक सर यांनी पोडीयम संच स्वीकारला. प्रसंगी आदरणीय डॉ. अरविंद बडगुजर सर, उपप्राचार्य प्रा. गायकवाड सर, टीडीएफचे ज्येष्ठ पदाधिकारी तथा माजी माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष मा. राजेंद्र शिंदे सर, आदरणीय बी.के. धूत सर, मुख्याध्यापक आर.टी.आर.टी. पाटील सर, जि.प. शाळा क्र. २ चे मुख्याध्यापक महेंद्र पाटील सर, जिजामाता विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रवीण केदार सर, मा. गायकवाड सर, आदरणीय जाधव सर, मदन भावसार, केंद्रप्रमुख सुनिल महाजन सर, अजिज शेख सर, संजय इंगळे सर तसेच तालुक्यातील सर्व पोडीयम प्राप्त शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोडीयम प्राप्त शाळा पुढीलप्रमाणे :
१) नवलभाऊ माध्यमिक विद्यालय, ताडे
२) जि.प. प्राथमिक केंद्र शाळा, उत्राण गु.ह.
३) शहजादी उर्दू प्रायमरी स्कूल, कासोदा
४) जि.प. प्राथमिक मराठी शाळा क्र. २, एरंडोल
५) उन्नती माध्यमिक विद्यालय, एरंडोल
६) सार्वजनिक माध्यमिक विद्यालय, कासोदा
७) माध्यमिक विद्यालय, भालगाव
८) गौरीशंकर माध्यमिक विद्यालय, रंवजे
९) सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय, पिंपळकोठा
१०) जिजामाता माध्यमिक विद्यालय, एरंडोल

आमदार सत्यजित दादा तांबे साहेबांनी एरंडोल तालुक्यासाठी १० पोडीयम संच उपलब्ध करून दिल्याबद्दल तालुक्यातील सर्व शिक्षकवर्गाच्या वतीने त्यांचे जाहीर आभार मानण्यात आले. शिक्षणाच्या गुणवत्तावृद्धीसाठी आमदारांनी दाखविलेली सकारात्मक भूमिका निश्चितच प्रेरणादायी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *