अन्नदानाची अखंड परंपरा; हरीओम बाबांचा महाप्रसाद समितीकडून यथोचित सन्मान,  पारोळ्यातील अन्नछत्र मंडळाच्या मासिक बैठकीत दानशूर भक्ताचा गौरव
1 min read

अन्नदानाची अखंड परंपरा; हरीओम बाबांचा महाप्रसाद समितीकडून यथोचित सन्मान, पारोळ्यातील अन्नछत्र मंडळाच्या मासिक बैठकीत दानशूर भक्ताचा गौरव

Loading

अन्नदानाची अखंड परंपरा; हरीओम बाबांचा महाप्रसाद समितीकडून यथोचित सन्मान

पारोळ्यातील अन्नछत्र मंडळाच्या मासिक बैठकीत दानशूर भक्ताचा गौरव

पारोळा प्रतिनिधी :
श्री बालाजी संस्थान, श्री क्षेत्र पारोळा संचलित श्री व्यंकटेश बालाजी महाप्रसाद समिती चॅरिटेबल ट्रस्ट अन्नछत्र मंडळाची मासिक बैठक भक्तिभाव आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या बैठकीत पारोळा येथील भाजीपाला व्यापारी श्री शिवाजी देवराम महाजन उर्फ हरीओम बाबा यांच्या उदात्त दातृत्वाचा विशेष गौरव करण्यात आला.
अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. या उक्तीला साजेसा आदर्श ठेवत हरीओम बाबा स्वतःहून अन्नछत्र मंडळासाठी नियमितपणे भाजीपाला उपलब्ध करून देतात. बटाटे, कांदे, लसूण, आलं तसेच विविध ताज्या भाज्यांचा पुरवठा ते प्रसादालयात पोहोचवतात. त्यांच्या या सातत्यपूर्ण आणि निस्वार्थ सेवेमुळे महाप्रसादाची व्यवस्था सुरळीत पार पडत असून अनेक भाविकांना अन्नदानाचा लाभ मिळत आहे.
“आपण समाजाचे देणे लागतो. त्यामुळे माझ्या परीने शक्य तितकी मदत करण्याचा मी प्रयत्न करतो,” असे मनोगत व्यक्त करत हरीओम बाबांनी आपली समाजसेवेची भूमिका अधोरेखित केली. बालाजीचे निस्सीम भक्त असलेल्या हरीओम बाबांच्या या सेवाभावाला उपस्थितांनी दाद दिली.
बैठकीत विश्वस्त मंडळाने हरीओम बाबा यांना विशेष आमंत्रित करून त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार व सन्मान केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री गुणवंतराव पाटील यांनी केले.
सत्कार प्रसंगी महाप्रसाद समितीचे अध्यक्ष श्री नानासो ए. टी. पाटील (मा. खासदार), बालाजी मंदिराचे मुख्य विश्वस्त श्री श्रीकांत सोनवणे, विश्वस्त श्री डॉ. अनिल गुजराथी, प्रकाश आबा शिंपी, बंडू नाना वाणी, दिलीप शिरुडकर, दिनेश गुजराथी, ॲड. दत्ताजी महाजन, प्रमोद शिरोळे, गुणवंतराव पाटील सर, प्रविणकुमार कोळी, किरण वाणी, बापू कुंभार, अमोल अमृतकार आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी समितीचे व्यवस्थापक सतीश वाघ व अनिल कुलकर्णी यांनी विशेष परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन श्री प्रविणकुमार कोळी यांनी केले.
अन्नदानाच्या या पवित्र परंपरेतून समाजात सेवा, समर्पण आणि भक्तीचा सुंदर संदेश देणाऱ्या हरीओम बाबांसारख्या दानशूर व्यक्तींचा आदर्श नक्कीच प्रेरणादायी ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *