साहित्य, संस्कार आणि संवादाचा सेतू : अमळनेरच्या साने गुरुजी ग्रंथालयातून जळगावपर्यंत ज्ञानस्नेहाची उब
![]()
साहित्य, संस्कार आणि संवादाचा सेतू : अमळनेरच्या साने गुरुजी ग्रंथालयातून जळगावपर्यंत ज्ञानस्नेहाची उब
मराठी लाईव्ह न्युज नेटवर्क..
अमळनेर येथील सुप्रसिद्ध पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे चिटणीस आण्णासाहेब प्रकाश वाघ यांनी आज जळगाव येथे जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रविंद्र ठाकूर यांची सदिच्छा भेट घेत साहित्य-संवादाचा एक सुंदर सेतू उभारला. या प्रसंगी त्यांनी डॉ. ठाकूर यांना अमळनेर भेटीचे सस्नेह आमंत्रण देत साने गुरुजींच्या विचारविश्वाचा सुगंध लाभलेले ‘सानेगुरुजींची गाथा’ हे पुस्तक भेट दिले.
ही भेट केवळ औपचारिक नव्हती, तर ज्ञान, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी यांचा परस्पर सन्मान व्यक्त करणारा भावस्पर्शी क्षण ठरला. साने गुरुजींच्या विचारांचा प्रकाश अधिक व्यापक पातळीवर पोहोचावा, वाचनसंस्कृती दृढ व्हावी आणि ग्रंथालय चळवळीला नवे बळ मिळावे, या उद्देशाने झालेल्या या संवादातून साहित्यसेवेची उब आणि सामाजिक जाणीवेची ऊर्मी प्रकर्षाने जाणवली.

