प्रथम सूर्यवंशी यांना ‘महाराष्ट्र रत्न’ राष्ट्रीय सेवाकार्य पुरस्कार  पुरस्काराने नवी ऊर्जा; समाजसेवेसाठी अधिक जोमाने काम करणार – प्रथम सूर्यवंशी
1 min read

प्रथम सूर्यवंशी यांना ‘महाराष्ट्र रत्न’ राष्ट्रीय सेवाकार्य पुरस्कार पुरस्काराने नवी ऊर्जा; समाजसेवेसाठी अधिक जोमाने काम करणार – प्रथम सूर्यवंशी

Loading

प्रथम सूर्यवंशी यांना ‘महाराष्ट्र रत्न’ राष्ट्रीय सेवाकार्य पुरस्कार

पुरस्काराने नवी ऊर्जा; समाजसेवेसाठी अधिक जोमाने काम करणार – प्रथम सूर्यवंशी

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर

धरणगाव : अनुश्री महिला बहुउद्देशीय संस्था, भुसावळ यांच्या वतीने संविधान दिनाचे औचित्य साधून देण्यात येणारा ‘महाराष्ट्र रत्न’ राष्ट्रीय सेवाकार्य-२०२५ पुरस्कार धरणगाव येथील करणी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष तसेच स्वामी विवेकानंद वाचनालयाचे अध्यक्ष प्रथम भरत सूर्यवंशी यांना प्रदान करण्यात आला.
विशेष म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातून सामाजिक सेवेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या अवघ्या २१ मान्यवरांची निवड या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी करण्यात आली असून, त्यामध्ये प्रथम सूर्यवंशी यांचा समावेश झाला आहे. भुसावळ येथे पार पडलेल्या भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात अनुश्री महिला बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा जयश्री इंगळे, राष्ट्रीय करणी सेनेचे अध्यक्ष दामोदर राजपूत, नोबेल इंग्लिश स्कूलच्या अध्यक्षा डॉ. अर्चना सूर्यवंशी, नगराध्यक्षा गायत्री भंगाळे तसेच सौ. देवयानी सूर्यवंशी यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेत जयश्री इंगळे यांनी प्रथम सूर्यवंशी यांनी शहर व परिसरात राबवलेल्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रमांसह विविध नवोपक्रमांची माहिती देत त्यांच्या विद्यार्थीहितैषी व उपक्रमशील कार्याचा गौरव केला. पुरस्काराचे स्वरूप संविधान उद्देशिका प्रत, सन्मानचिन्ह, शाल, पुस्तके व पुष्पगुच्छ असे होते. पुरस्कार स्वीकारताना प्रथम सूर्यवंशी यांनी कृतज्ञता व्यक्त करत सांगितले की, हा सन्मान माझी जबाबदारी अधिक वाढवणारा असून समाजातील उपेक्षित, वंचित व दुर्लक्षित घटकांसाठी अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मला मिळाली आहे. या यशाबद्दल नातेवाईक, मित्रपरिवार तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून प्रथम सूर्यवंशी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, अनेकांनी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *