म्युनिसिपल हायस्कूल येथे संत गुरु रविदास महाराज यांची ६४९ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी…!
![]()
म्युनिसिपल हायस्कूल येथे संत गुरु रविदास महाराज यांची ६४९ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी…!
भुसावळ नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल येथे संत गुरु रविदास महाराजांची६४९ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एस.जी. मेढे हे होते, प्रमुख अतिथी म्हणून राजू समशेर तसेच शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. प्रथम शाळेच्या जेष्ठ शिक्षिका एस. एन. बनसोडे यांच्या हस्ते संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. तसेच शाळेचा माजी विद्यार्थी राजू समशेर व शाळेचे मुख्याध्यापक सुभाष मेढे यांनी संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेस मल्यार्पण करून अभिवादन केले. राजू समशेर यांनी विविध दोह्यांच्या माध्यमातून संत रविदास यांच्या कार्यावरती प्रकाश टाकला तसेच एस.टी. चौधरी. यांनी आपल्या मनोगतात संत रोहिदास यांचे कार्य विषद केले. अध्यक्षीय भाषण शाळेचे मुख्याध्यापक एस. जी. मेढे यांनी केले. त्यात त्यांनी संत रोहिदास महाराजांच्या संपूर्ण कार्यावरती विस्तृत असा प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन एन.एच. राठोड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे योगदान लाभले.

