शताब्दी वर्षानिमित्त के. एल. पोंदा हायस्कूल, डहाणू येथे शिक्षकांसाठी BMD आरोग्य तपासणी शिबिर
1 min read

शताब्दी वर्षानिमित्त के. एल. पोंदा हायस्कूल, डहाणू येथे शिक्षकांसाठी BMD आरोग्य तपासणी शिबिर

Loading

शताब्दी वर्षानिमित्त के. एल. पोंदा हायस्कूल, डहाणू येथे शिक्षकांसाठी BMD आरोग्य तपासणी शिबिर

 

ठाणे प्रतिनिधी

दि. डहाणू एज्युकेशन ट्रस्ट – के. एल. पोंदा हायस्कूलच्या शताब्दी महोत्सवानिमित्त उपाध्यक्ष मा. श्री अजय बाफना आणि विश्वस्त मा. डॉ. रोहित भंसाली यांच्या संकल्पनेतून, संस्थेचे सर्व विश्वस्त व कार्यकारिणी सदस्य यांच्या प्रेरणेतून तसेच मुख्याध्यापक मा. श्री सोपान इंगळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील आजी-माजी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या आरोग्य संवर्धनासाठी गुरुवार, दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी श्री बटुकभाई पोंदा सभागृह के.एल.पोंदा हायस्कूल, डहाणू येथे Bone Mineral Density Checkup Camp (BMD Camp) चे आयोजन करण्यात आले.

या आरोग्य शिबिरासाठी डहाणू येथील सुप्रसिद्ध डॉ. संजय सोहनी, डॉ एस.जी. भंसाली, डॉ.लक्ष्मण सोनावणे, डॉ. आदित्य अहिरे व त्यांच्या सोबत श्री विनोद शिरसाठ मॅनेजर मेयर विटाबायोटिक्स मुंबई, श्री आदर्श मिश्रा- टेक्निशियन आणि अभिषेक आंद्रे टेक्निशियन यांची उपस्थिती लाभली. सकाळी 9.30 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत चाललेल्या या शिबिरामध्ये संस्थेतील एकूण 101 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कॅल्शियम व हाडांची घनता तपासणी करण्यात आली.

तपासणीदरम्यान प्रत्येक कर्मचाऱ्याची वैयक्तिक पातळीवर सखोल तपासणी करून कॅल्शियमची पातळी, हाडांची मजबुती, आहारविषयक सवयी तसेच दैनंदिन जीवनशैली याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. गरजेनुसार पुढील काळजी, योग्य आहार, व्यायाम व आवश्यक औषधोपचारांविषयी तज्ज्ञ डॉक्टरांनी वैयक्तिक समुपदेशन केले. संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. तरुण पोंदा यांच्या अध्यक्षतेखाली आणि मानद सचिव मा. श्री. सुधीर कामत, कोषाध्यक्ष मा. श्री. सुनील पोंदा आणि विश्वस्त डॉ. रोहित भंसाली यांच्या उपस्थितीत कार्यक्रम यशस्वी पार पडला.

शिक्षक व कर्मचारी यांच्या आरोग्याकडे संवेदनशीलतेने पाहणारी ही योजना संस्थेच्या समाजाभिमुख व कर्मचारीहितैषी धोरणाचे उत्तम प्रतीक ठरली. या शिबिरामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली असून सर्वांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.

शताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या आरोग्य उपक्रमामुळे “सुदृढ शिक्षक – सक्षम विद्यार्थी – सक्षम राष्ट्र” या संकल्पनेला बळ मिळाले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे व्यवस्थापन, मुख्याध्यापक तसेच सर्व समन्वयकांचे विशेष कौतुक करण्यात आले.

— मुख्याध्यापक
के. एल. पोंदा हायस्कूल, डहाणू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *