लिनेस क्लब ऑफ अमळनेरची नवी कार्यकारिणी जाहीर कविता पारेख अध्यक्ष, आचल अग्रवाल सचिव, भाग्यश्री मणियार खजिनदार
![]()
लिनेस क्लब ऑफ अमळनेरची नवी कार्यकारिणी जाहीर
कविता पारेख अध्यक्ष, आचल अग्रवाल सचिव, भाग्यश्री मणियार खजिनदार
अमळनेर प्रतिनिधी
: लिनेस क्लब ऑफ अमळनेरचा पदग्रहण सोहळा मंगळवार, दि.२० जानेवारी रोजी अत्यंत उत्साहपूर्ण व गरिमामय वातावरणात पार पडला. सन २०२६–२०२७ या कार्यकाळासाठी अध्यक्षपदी कविता पारेख, सचिवपदी आचल (अचल) अग्रवाल तर खजिनदारपदी भाग्यश्री मणियार यांची निवड करण्यात आली.
पदग्रहण समारंभाच्या अध्यक्षस्थानी क्लब अध्यक्षा कविता पारेख होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून डिस्ट्रिक्ट पी.आर.ओ. जॅस्मिन भरुचा, तसेच इन्स्टॉलिंग ऑफिसर व पास्ट डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट कंचन शाह, परमिंदर कॉलरा, कल्पना शहा, डॉ. मंजुश्री जैन, नयना नवसारीकर आदी मान्यवर उपस्थित होते. शपथविधीनंतर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना बॅज प्रदान करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात कविता पारेख यांनी आगामी वर्षातील सामाजिक व सेवाभावी उपक्रमांची सविस्तर रूपरेषा मांडली. लिनेस क्लबच्या सेवाभावी कार्याचा ठसा उमटवत सकाळी नर्मदा वाडी येथे गरजूंसाठी अन्नदान कार्यक्रम वर्षा दोधिवाला यांच्या सहकार्याने राबविण्यात आला. संध्याकाळी ‘माँ से बेटी सवाई’ या उपक्रमांतर्गत नेहा कासोदेकर (LLB) यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच देशसेवा करणारे सैनिक अतुल बाविस्कर (गांधली) यांचा गौरव करण्यात आला. खा. शि. मंडळ, अमळनेर येथे महिला संचालकपदी निवड झाल्याबद्दल लिनेस लीना पाटील, तसेच नुकतीच LLB पदवी प्राप्त केल्याबद्दल सदस्य नम्रता हिंदुजा यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जया जैन व रुपाली सिंघवी यांनी केले, तर आभार प्रदर्शन आचल अग्रवाल यांनी केले. कार्यक्रमानंतर सौहार्दपूर्ण वातावरणात हळदी-कुंकू समारंभ पार पडला.
या पदग्रहण सोहळ्यास क्लबच्या माजी अध्यक्षा डॉ.मयुरी जोशी, तसेच सोनल जोशी, रश्मा काटारिया, रुपाली मुंदडा, आशा महाले, राजुल गांधी, शितल पाटील, रुपाली पहाडे, अलका नांदा, सोनल पवार, भारती धनगर यांच्यासह क्लबच्या सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


