चौथ्यांदा मिळालेला विश्वास, कर्तृत्वाचा गौरव : वसुंधराताई लांडगे यांचा भावनिक ‘हृदय सत्कार’
1 min read

चौथ्यांदा मिळालेला विश्वास, कर्तृत्वाचा गौरव : वसुंधराताई लांडगे यांचा भावनिक ‘हृदय सत्कार’

Loading

चौथ्यांदा मिळालेला विश्वास, कर्तृत्वाचा गौरव : वसुंधराताई लांडगे यांचा भावनिक ‘हृदय सत्कार’

अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
खान्देश शिक्षण मंडळाच्या विश्वस्तपदी चुरशीच्या व प्रतिष्ठेच्या लढतीत चौथ्यांदा निवडून आलेल्या सौ. वसुंधरा दशरथ लांडगे यांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन अत्यंत आपुलकीने व भावनिक वातावरणात हृदय सत्कार करण्यात आला. हा सत्कार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका व दहिवद गावाच्या मा. लोकनियुक्त सरपंच सौ. सुषमाताई वासुदेव देसले पाटील, नाशिक ग्रामीणचे डीवायएसपी वासुदेव देसले साहेब, पत्रकार ईश्वर महाजन व शुभम देसले यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या सत्कारप्रसंगी वातावरण केवळ औपचारिक न राहता, कर्तृत्व, संघर्ष आणि माणुसकीच्या नात्यांनी भारलेले झाले होते. सुषमाताई देसले व वासुदेव देसले साहेब यांनी विविध विषयांवर संवाद साधत वसुंधराताई लांडगे यांच्या सातत्यपूर्ण यशामागील रहस्य उलगडून सांगितले. निष्ठा, पारदर्शकता, शिक्षणप्रेम आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन हीच त्यांच्या यशाची खरी ओळख असल्याचे त्यांनी नमूद केले.

कर्तृत्वासोबत कुटुंबसंस्कारांची जपणूक

शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळत असतानाच वसुंधराताई लांडगे यांनी कधीही आपल्या परिवाराकडे दुर्लक्ष केले नाही, हे विशेषत्वाने अधोरेखित झाले. त्यांनी दोन्ही मुलींना उच्चशिक्षित करून सन्माननीय नोकरीपर्यंत पोहोचवले. दोन्ही जावई उच्च पदावर कार्यरत असून, “जावई म्हणजेच माझी मुलं” या भावनेने त्यांनी संपूर्ण कुटुंब एकत्र बांधून ठेवले आहे.
त्यांचा परिवार मितभाषी, सुसंस्कृत, सजग व अभ्यासू असून, कौटुंबिक संस्कारांची भक्कम पायाभरणी येथे दिसून येते. विशेष म्हणजे नातवंडे आजीशिवाय राहत नाहीत, इतके घट्ट भावनिक नाते या कुटुंबात पाहायला मिळते.

भावनांना वाट मोकळी करून दिलेली मनमोकळी कबुली

या प्रसंगी परिवाराविषयी बोलताना वसुंधराताई भावूक झाल्या. आपल्या आयुष्यातील चढ-उतार, जबाबदाऱ्या आणि कुटुंबाने दिलेला खंबीर आधार याविषयी त्यांनी सुषमाताई देसले यांच्याजवळ मन मोकळे केले.
“माझ्या प्रत्येक यशामागे पती दशरथनाना लांडगे यांचा भक्कम पाठिंबा, कुटुंबाची साथ आणि सर्व क्षेत्रातील मान्यवरांच्या शुभेच्छा आहेत; म्हणूनच मी निर्भयपणे काम करू शकते,” असे त्या म्हणाल्या.
यावेळी वसुंधराताई लांडगे यांनी सत्कारासाठी आलेल्या सौ. सुषमाताई देसले यांना मनःपूर्वक शुभेच्छा देतांना म्हणाल्या की,
“तुम्ही आज जिल्हा परिषद सदस्य आहातच; येणारी निवडणूक लक्षात घेता मी आजच तुम्हाला शुभेच्छा देते. कारण तुमचे काम सर्वसमावेशक आहे आणि देसले साहेबांना मानणारा मोठा जनसमूह तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.”
यावेळी डीवायएसपी वासुदेव देसले साहेब यांनी सुषमाताई देसले यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचे कौतुक करत सांगितले की, कुटुंब सांभाळत समाजकार्यात सातत्याने कार्य करणे हे खरोखरच प्रेरणादायी आहे. वसुंधराताई लांडगे यांनीही सुषमाताई देसले यांना पुढील प्रत्येक निवडणुकीस यश लाभो, अशा मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
हा सत्कार सोहळा म्हणजे कर्तृत्वाचा सन्मान, कुटुंबमूल्यांचा गौरव आणि समाजासाठी कार्य करणाऱ्या नेतृत्वाला दिलेले भावनिक बळ ठरला, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *