खासदार स्मिताताई वाघ यांच्या पुढाकारातून आज अमळनेर येथे राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत सहाय्यक साहित्य वाटप
1 min read

खासदार स्मिताताई वाघ यांच्या पुढाकारातून आज अमळनेर येथे राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत सहाय्यक साहित्य वाटप

Loading

खासदार स्मिताताई वाघ यांच्या पुढाकारातून आज अमळनेर येथे राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत सहाय्यक साहित्य वाटप

राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत अमळनेर येथे सहाय्यक साहित्य वाटप

अमळनेर प्रतिनिधी
खासदार स्मिताताई वाघ यांच्या माध्यमातून अमळनेर शहरात केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत वयोवृद्ध नागरिकांना सहाय्यक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.
यापूर्वी इंद्रभुवन येथे आयोजित कॅम्पमध्ये तपासणी झालेल्या व पात्र ठरलेल्या वयोवृद्ध लाभार्थ्यांसाठी हे साहित्य वाटप करण्यात येणार असून, या अंतर्गत कंबर पट्टा, गुडघ्याचा पट्टा, कमोड चेअर, काठी तसेच श्रवण यंत्र यांचा समावेश आहे.
या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी स्वतः उपस्थित राहणे आवश्यक आहे, असे आयोजकांकडून कळविण्यात आले आहे.

📍 ठिकाण : मिल कंपाऊंड, रिलायन्स मॉलच्या मागे, अमळनेर
⏰ वेळ : आज, बुधवार दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9.00 वाजता

या सामाजिक उपक्रमामुळे वयोवृद्ध नागरिकांना दैनंदिन जीवनात दिलासा मिळणार असून, या योजनेबद्दल लाभार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *