◆ *प्रेरक आणि उभारी देणाऱ्या वातावरणात युवा चेतना संमेलन संपन्न* ◆ *नोबेल फाउंडेशन जळगाव व सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट फैजपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन*.
1 min read

◆ *प्रेरक आणि उभारी देणाऱ्या वातावरणात युवा चेतना संमेलन संपन्न* ◆ *नोबेल फाउंडेशन जळगाव व सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट फैजपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन*.

Loading

◆ *प्रेरक आणि उभारी देणाऱ्या वातावरणात युवा चेतना संमेलन संपन्न*
◆ *नोबेल फाउंडेशन जळगाव व सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट फैजपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन*.

जळगाव प्रतिनिधी

राष्ट्रीय युवक दिन आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त नोबेल फाउंडेशन जळगाव आणि सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट फैजपूर यांच्या संयुक्त विद्यमाने निष्कलंक धाम या पवित्र वास्तुत युवा चेतना संमेलन संपन्न झाले.परिसरातील शंभर युवक या शिबिरासाठी एकत्र आलेले होते. स्वामी विवेकानंदांना अपेक्षित असणारे 100 नचिकेत घडवावेत या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .सकाळीच नऊ वाजेपासून वडोदा येथील निष्कलंक धाम या भव्य वास्तूत युवकांचे येणे सुरू झाले. सर्व तरुण सकाळच्या थंडीत चहा घेऊन शिबिर स्थळी दाखल झाले.
कार्यक्रमाचा शुभारंभ फैजपूर येथील प्रांताधिकारी आदर्श व्यक्तिमत्व बबनराव काकडे साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून परमपूज्य महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज उपस्थित होते. तसेच नोबेल फाउंडेशनचे संचालक जयदीप पाटील ,धनाजी नाना चौधरी महाविद्यालयाचे प्रोफेसर डॉ. राजेंद्र राजपूत, माजी आर्मी ऑफिसर रमेश पाटील ,श्री रत्नपारखी साहेब उपस्थित होते .याप्रसंगी यावल रावेर मतदार संघाचे आमदार अमोल जावळे यांनी शिबिर स्थळी येऊन तरुणांशी संवाद साधला.

*मान्यवराचे अनमोल मोती-*

*१) श्री जनार्दन हरी महाराज*-आपल्या प्रेरक प्रवचनात महाराज यांनी तरुणांना उपदेशात अनमोल मार्गदर्शन केले .ते म्हटलेत गणपती आणि देवीच्या मिरवणुकांमध्ये गाढवासारखा नाचणारा तरुण कधीही देशाला दिशा देऊ शकत नाही. या युगामध्ये गणपती आणि देवी यांच्या नावाने सुरू असलेली फॅशन ही विघातक आहे. यामुळे तरुणांनी गणपती आणि देवी उत्सवामध्ये डीजे मिरवणुका नाचगाणे यासारख्या गोष्टी बंद कराव्यात. तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन समजून घ्यावे. प्रत्येक तरुणाने बलोपासनाला महत्त्व द्यावे .सकाळ संध्याकाळ व्यायाम शाळेत जाऊन व्यायाम करावा. आपल्या देशाची संस्कृती समजून घ्यावी. भरकटलेले तरुण देशाला कोणत्या दिशेला नेतील हे सांगता येत नाही. तरुणांमध्ये असणारी अनास्था ही धोकेदायक आहे. स्वामी विवेकानंद जेव्हा अमेरिकेला जायला निघाले तेव्हा स्वामीजींकडे एक रुपया सुद्धा नव्हता, परंतु अमेरिकेहून परत आल्यानंतर भारतभर त्यांच्या मिरवणुका निघाल्या कारण त्यांनी स्वतःला सिद्ध केलेले होते. विवेकानंदांसारखे तेजस्वी युवक या देशाची गरज आहे. आपल्या जीवनाशिवाय इतरांच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने प्रकाश आणता येईल यावर तरुणांनी विचार करावा. देव ,देश ,धर्म ,राजकारण, समाजकारण या गोष्टी समजून घ्या .मुस्लिमांचा विरोध करणे म्हणजे हिंदुत्व होऊ शकत नाही .आपल्या देशाला एपीजे अब्दुल कलाम यांच्यासारख्या आदर्श मुस्लिम व्यक्तींची आवश्यकता आहे. फैजपुर आणि परिसरातील युवकांमध्ये सकारात्मक बदल घडावेत यासाठी यापुढे निष्कलंक धाम येथे अनेक शैक्षणिक उपक्रम राबविले जातील असेही महाराजांनी सांगितले.

*२) श्री बबनराव काकडे उपजिल्हाधिकारी* – यांनी सांगितले की कोणत्याही गोष्टीचा सखोल अभ्यास करा. करिअर घडवितांना आपण एखाद्या विषयाला वरच्यावर अभ्यास करतो परंतु त्या विषयांमध्ये सखोल अभ्यास करून त्या विषयाची मास्टरी प्राप्त करा. लहान मोठे ध्येय डोळ्यासमोर ठेवा. ध्येयाच्या दिशेने प्रवास करत रहा एक दिवस तुम्ही यशस्वी झालेले असाल.

*३) आमदार अमोल जावळे* -तरुणांनो अध्यात्मिक ऊर्जाच आपल्या मनामध्ये शांतता निर्माण करू शकते. उच्चशिक्षित होऊन सुद्धा आपल्याला आपले मन सांभाळता येत नाही .अशावेळी अध्यात्मिक शक्ती आपल्याला मदत करते .आपला देश उत्तमरीत्या चालवण्यासाठी तसेच प्रशासन आणि राजकारण योग्यरित्या चालवण्यासाठी चांगल्या तरुणांनी राजकारणात येणे अत्यंत आवश्यक आहे. चांगल्या तरुणांच्या हातात देश असेल तर आपल्याला लवकर आपला देश विकसित भारत करता येईल. विकसित भारताच्या मोहिमेमध्ये तरुणांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी डॉ.जयदीप पाटील तसेच डॉक्टर राजेंद्र राजपूत यांनी तरुणांसाठी व्यक्तिमत्व विकास, आदर्श जीवनपद्धती करिअर कसे घडवावे ? या विषयावर अत्यंत उपयुक्त अशा कार्यशाळा घेतल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिसरातील तरुणांनी परिश्रम घेतले .याप्रसंगी स्वराज्य फाउंडेशनच्या नीलिमा पाटील ,लिटल स्टार स्कूलच्या कीर्ती, अरोरा इंग्लिश झोनचे शुभम इंगळे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *