महात्मा फुले हायस्कूल शाळेचा इलेमेंट्री व इंटरमिजिएट चित्रकला परीक्षेचा १००% निकाल !…  सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व कला शिक्षकांचे अभिनंदन – जे एस पवार [ मुख्याध्यापक ]
1 min read

महात्मा फुले हायस्कूल शाळेचा इलेमेंट्री व इंटरमिजिएट चित्रकला परीक्षेचा १००% निकाल !… सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व कला शिक्षकांचे अभिनंदन – जे एस पवार [ मुख्याध्यापक ]

Loading

महात्मा फुले हायस्कूल शाळेचा इलेमेंट्री व इंटरमिजिएट चित्रकला परीक्षेचा १००% निकाल !…

सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व कला शिक्षकांचे अभिनंदन – जे एस पवार [ मुख्याध्यापक ]

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील

धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेचा साला- बादा प्रमाणे यावर्षी देखील शासकिय इलेमेंट्री व इंटरमिजिएट चित्रकला स्पर्धेचा निकाल १०० % लागला आहे.
२०२५ -२०२६ या शैक्षणिक वर्षात इंटरमिजीएट चित्रकला परीक्षेला १२ पैकी १२ विद्यार्थी व इलेमेंट्री परीक्षेला ८ पैकी ८ विदयार्थी अ, ब व क श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. या सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील कलाशिक्षक एच डी माळी यांचे मार्गदर्शन लाभले.
शाळेतील कलाशिक्षक एच.डी.माळी यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार यांनी केले. तसेच सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले. या प्रसंगी शाळेतील सर्व उत्तीर्ण विद्यार्थी व शिक्षक बंधू -भगिनी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी डी पाटील व आभार व्ही टी माळी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *