पत्रकार दिनानिमित्त धरणगाव रोटरी क्लबतर्फे भव्य रोगनिदान व दंत शिबिर उत्साहात संपन्न*
1 min read

पत्रकार दिनानिमित्त धरणगाव रोटरी क्लबतर्फे भव्य रोगनिदान व दंत शिबिर उत्साहात संपन्न*

Loading

*पत्रकार दिनानिमित्त धरणगाव रोटरी क्लबतर्फे भव्य रोगनिदान व दंत शिबिर उत्साहात संपन्न*

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील

धरणगाव : महाराष्ट्रातील व मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र “दर्पण” ६ जानेवारी १८३२ रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले. या ऐतिहासिक दिनाचे औचित्य साधत पत्रकार दिनानिमित्त लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकार बांधवांसह कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रात्रंदिन कार्यरत असलेल्या पोलीस बांधवांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी रोटरी क्लब धरणगाव यांच्या वतीने पोलिस स्थानकाच्या प्रांगणात मोफत आरोग्य तपासणी व दंत शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन पोलिस स्थानकाचे निरीक्षक सुनील पवार, अधिकृत पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष ॲड. व्ही. एस. भोलाणे, रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रा. ए. आर. पाटील तसेच मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.
शिबिरात फोर्टिस हॉस्पिटलचे संचालक डॉ. धीरल महाजन (एम.डी. मेडिसिन), शिंदे क्लिनिकचे डॉ. अतुल शिंदे, सिद्धी क्लिनिकचे डॉ. मनोज अमृतकर, वेदांत दंत क्लिनिकचे डॉ. सचिन पेंढारे, श्री दंत क्लिनिकचे डॉ. अभिजित पाटील आदी तज्ज्ञ डॉक्टरांनी सेवा दिली. यावेळी ४० हून अधिक पत्रकार व पोलीस बांधवांची रक्तदाब, रक्तातील साखर (डायबिटीज), थायरॉईड, ईसीजी, हृदयविकार तपासणी तसेच दंत आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिर यशस्वीतेसाठी रोटरी क्लबचे डी.डी.पाटील सर, किशोर येवले, नितीन पाटील सर, भागवत मराठे, दिनेश माळी, रवींद्र हरपे, डॉ. कांचन महाजन, डॉ.किरण पाटील, राकेश सोनार, गजानन साठे यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले. पत्रकार दिनानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होऊन पत्रकार ॲड.व्ही एस भोलाणे यांनी सर्व डॉक्टरांच्या पथकाचे व रोटरी क्लब धरणगावच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *