संभाजीनगर येथे सत्यशोधक समाजाचे ४३ वे राज्य अधिवेशन*
1 min read

संभाजीनगर येथे सत्यशोधक समाजाचे ४३ वे राज्य अधिवेशन*

Loading

संभाजीनगर येथे सत्यशोधक समाजाचे ४३ वे राज्य अधिवेशन*

सत्यशोधक समाज संघ आयोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब संयुक्त जयंती व ज्येष्ठ सत्यशोधक डॉ.बाबा आढाव यांच्या स्मृतीनिमित्त सत्यशोधक समाजाचे ४३ वे राज्य अधिवेशन दिनांक ३ व ४ जानेवारी २०२६ रोजी छत्रपती संभाजी नगर येथील महंत ज्ञानगिरी बुवा नगरी, संत एकनाथ नाट्य मंदिर, उस्मानपुरा येथे संपन्न होत आहे. संमेलनाचे उद्घाटक कोरनेश्वर अप्पा ( लिंगायत धर्मगुरू, गुलबर्गा , कर्नाटक ) करणार असून स्वागताध्यक्ष उद्योजक वैजनाथ घडलिंग ( छत्रपती संभाजी नगर ) आहेत. कार्यक्रमास विशेष उपस्थिती श्रीमंत राजे अमरनाथ बारगळ ( जहागिरदार , तळोदे संस्थान ) व उत्तमराव ( नाना ) पाटील [ तरवडी ] यांची आहे. प्रमुख पाहुणे सर्वश्री रेणुका कड ( विकास अध्ययन केंद्र व कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट ), ॲड. धनंजय बोरडे ( सचिव, संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळ ), ह.भ.प. दादा महाराज पनवेलकर ( राष्ट्रीय अध्यक्ष , मूलनिवासी वारकरी परिषद ), इंजिनिअर वाजेद कादरी ( जमाते इस्लामी हिंद ), रामराव लोहोट ( जिजाऊ ज्ञानतीर्थ , परभणी ) आहेत. यावेळी प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर अंकुशराव कदम, डॉ.वासुदेव मुलाटे , सूर्यकांता ताई गाडे , प्रा. प्रल्हाद लुलेकर , मंगल खिवसरा, शांताराम पंदेरे , रामभाऊ पेरकर , डॉ.संजय मून, के. ई . हरिदास,भीमराव सरवदे , डॉ. अनिल धुळे, डॉ.राजेंद्र धनवई राहणार आहेत. यावेळी सत्यशोधक समाजाचे संस्थापक अध्यक्ष अरविंद खैरनार सत्यशोधक समाजाची भूमिका मांडतील. यावेळी विविध क्षेत्रात विशेष कामगिरी बजावणाऱ्या पुढील मान्यवर व्यक्तींचा विशेष सत्कार करण्यात येईल.
पुरस्कारार्थी : – दिनमित्रकार मुकुंदराव पाटील पत्रकारिता पुरस्कार :- जेष्ठ पत्रकार स.सो. खंडाळकर , डॉ.बाबासाहेब आंबेडकर विधीज्ञ पुरस्कार : – ॲड. मोहनिश थोरात ( औरंगाबाद खंडपीठ ), सत्यशोधक नारायण मेघाजी लोखंडे वृत्तपत्र संपादक पुरस्कार :- रतनकुमार साळवे ( दैनिक निळे प्रतीक )
सत्कार समारंभाच्या कार्याध्यक्षपदी ॲड. सुभाष महेर ( सामाजिक कार्यकर्ते ) असून मुख्य निमंत्रक चेतन राऊत ( उद्योजक ), मुख्य संयोजक अनिल थोरात ( सामाजिक कार्यकर्ते ) आहेत.
अधिवेशनाचा प्रारंभ ३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १२ ते २ वाजे दरम्यान क्रांती दिंडीने होईल. क्रांतीदिंडी महात्मा फुले चौक, औरंगपुरा – क्रांतीचौक – संत एकनाथ नाट्य मंदिर अशी राहील. *उद्घाटन सत्र दुपारी २ ते ४* या वेळेत संपन्न होईल. उद्घाटन सत्रास पुढील निमंत्रित मान्यवर उपस्थित राहतील.सर्वश्री इंजिनियर चंद्रशेखर शिखरे , प्रा.सुधीर चिंचाणे, इंजिनियर संजय सोनवणे, प्रा.भारत शिरसाट , वसुधा कल्याणकर , कनिष्क कलासरे , सविता अभ्यंकर , प्रकाश थोरात, इंजिनीयर मनोज घोडके , इंजिनिअर सतीश चकोर , प्रा. प्रकाश शिरसाठ, अनिल माळी ( तळोदा ), अनिल चौधरी, प्रा.ग.ह .राठोड, रावसाहेब गाजरे , प्राध्यापक अण्णा माळी, ज्ञानदेव खराडे, डॉ.अशोक चोपडे, सतीश जामोदकर , उत्तरेश्वर मोहोळकर , प्रा. विक्रम कांबळे, बाळासाहेब गरुड, प्रा.समाधान इंगळे, अनंत भवरे असतील. सुत्रसंचालन डॉ. सुनिता शिंदे प्रास्ताविक भाऊसाहेब जाधव आभार प्रदर्शन अनिल थोरात करतील.
सत्र पहिले दुपारी ४ ते ६ .३० दरम्यान शहीद भगतसिंग सांस्कृतिक मंच येथे होईल. अध्यक्षस्थानी प्राचार्य सुनील वाकेकर असून प्रमुख अतिथी डॉ. सुनील धुळे, इंजिनिअर शिवाजी लोखंडे ( बारामती ) उपस्थित राहतील. सत्यशोधक चळवळीचे विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण अंतर्गत नाटके , नृत्य , स्फूर्तीगीते , रँप सॉन्ज कार्यक्रम होईल.यावेळी सुत्रसंचालन निकिता जाधव व आभार प्रदर्शन तेजस शिंदे करतील. सत्र दुसरे ६.३० ते ९ या कालावधीत डॉ. गेल ऑम्वेट विचार मंचावर संपन्न होईल. दुसऱ्या सत्रात ” भारतीय महिलांच्या प्रगती व पतनासाठी कोण जबाबदार ? ” या विषयावर चर्चासत्र होईल. चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी प्रा. प्रतिभा अहिरे ( छत्रपती संभाजी नगर ) व संवादक ॲड . वैशाली डोळस ( छत्रपती संभाजीनगर ) , रिंम्पल जाधव ( कल्याण ), शायेस्ता कादरी ( जमाते इस्लाम ए हिंद , छत्रपती संभाजी नगर ), आस्था खैरनार ( सत्यशोधक चळळीच्या अभ्यासक )असतील.सुत्रसंचालन मनीषा पुंड , प्रास्ताविक अनिता देवतकर व आभार प्रदर्शन दीपिका खोबरे करतील. रात्री ९ ते १० दरम्यान भोजन अवकाश असेल.
दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी तिसरे सत्र सकाळी ९ .३० ते रात्री ११.३० दरम्यान सत्यशोधक गजमल माळी विचार मंचावर संपन्न होईल. तिसऱ्या सत्रात ” शेतीय चेतन प्रवाहाच्या / विचार प्रवाहाच्या ( अवैदिक अथवा अब्राम्हणी चेतन प्रवाहाच्या / विचार प्रवाहाच्या तार्किक गंतव्यास पोहोचवण्यांमधील समस्या व समाधान ” : भारतीय उपखंडातील विविध धार्मिक आणि सांप्रदायिक प्रवाहांचा विवेकशील आढावा ” या विषयांतर्गत होईल. अध्यक्षस्थानी प्रा.आर.एस. यादव परभणी ( सत्यशोधक चळवळीचे संस्थापक ) असून संवादक सर्वश्री. नवशाद उस्मान, यवतमाळ ( सुफी साहित्याचे अभ्यासक ), प्रा. संदीप तडस ,अमरावती ( महानुभाव पंथाचे अभ्यासक ), इंजिनियर शशिकांत उरगुंडे, लातूर ( लिंगायत धर्माचे अभ्यासक ), ह.भ.प.धर्मकीर्ती महाराज,परभणी ( वारकरी धर्माचे अभ्यासक ) असतील. सुत्रसंचालन राजकिशोर तायडे तर प्रास्ताविक सुरेश झाल्टे व आभार प्रदर्शन डॉ.डी.बी.शेंडे करतील.सत्र चौथे सकाळी ११.३० ते दुपारी १.३० दरम्यान कर्मयोगी संत गाडगेबाबा विचार मंच वर ” गीतेच्या शिकवणुकीने मराठा बलुतेदार व अलुतेदारांसोबत काय केले ? ” – एक सत्यशोधन उत्खनन ” या विषयावर संवादक डॉ.शशिकांत पट्टेकर , मुंबई ( संयोजक – स्टुडन्ट फॉर री कन्स्ट्रक्शन ऑफ सोसायटी ) असतील. सुत्रसंचालन ॲड.सुभाष महेर प्रास्ताविक प्रदीप कांबळे तर आभार प्रदर्शन इंजिनिअर कल्याण रंधे करतील. दुपारी १.३० ते २.३० दरम्यान भोजन अवकाश असेल .सत्र पाचवे सकाळी २ .३० ते ३.१५ या वेळेत संत चक्रधर स्वामी विचार मंच येथे संपन्न होईल.पाचव्या सत्रात ” संतांच्या , शिवरायांच्या व फुले – शाहू – आंबेडकरांच्या लेखणीने पावन झालेल्या मराठीच्या अस्मितेसाठी ” संवाद प्रा. डॉ. सुधाकर शेलार , अहिल्यानगर ( अहमदनगर महाविद्यालय,अहिल्यागर ) संवाद करतील. सुत्रसंचालन कांचन गादीकर प्रास्ताविक कैलास महाजन,आभार प्रा.विमल खेडकर करतील. दुपारी ३.३० ते ३.४५ ठराव वाचन भगवान रोकडे करतील. दुपारी ३.४५ ते ४.३० समारोप सत्र असेल. सत्राच्या अध्यक्षस्थानी मा. अरविंद खैरनार ( संयोजक, सत्यशोधक समाज संघ ) असून संवाद मा.सुरेश झाल्टे ( संयोजक , सत्यशोधक समाज संघ ) असतील. सुत्र संचालन विश्वासराव पाटील व आभार साळुबा पांडव करतील. कार्यकर्त्यांची मुक्कामाची व्यवस्था तिवारी मंगल कार्यालय, रेल्वे स्टेशन रोड येथे केलेली आहे. महाराष्ट्रातील सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते फुले , शाहू , आंबेडकर यांचे अभ्यासक व रसिकांनी संमेलनास बहुसंख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन राज्य समन्वय समितीचे जळगाव जिल्ह्याचे कार्यकर्ते रमेश वराडे ( जामनेर ) ,भरत जावदेकर ( अमळनेर ) , कैलास जाधव ( चाळीसगाव ) , राजेंद्र वाघ ( धरणगाव ) , विजय लुल्हे ( जळगाव ) , निवेदिता ताठे ( जळगाव ) यांनी केले आहे. बाहेर गावाहून आलेल्या कार्यकर्त्यांना काहीही अडचण आल्यास भाऊसाहेब जाधव – 96379 14117 , साळुबा पांडव – 94208 12071 , इंजिनिअर कल्याण रंधे – 94238 50511, ॲड . सुभाष महेर – 94227 14532 यांच्याशी संपर्क करावा .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *