लोकस्वातंत्र्यची पत्रकार चळवळ सशक्त* *लोकशाहीचे लक्षण….! अशोकभाऊ बारब्दे*  *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा ९ वा* *विचारमंथन मेळावा मुंबईत संपन्न…दिनर्शिका प्रकाशन!*  *महापुरूषांना अभिवादन,विविध बळींना श्रध्दांजली.नियुक्तीपत्र,ओळखपत्रांचे वितरण*
1 min read

लोकस्वातंत्र्यची पत्रकार चळवळ सशक्त* *लोकशाहीचे लक्षण….! अशोकभाऊ बारब्दे* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा ९ वा* *विचारमंथन मेळावा मुंबईत संपन्न…दिनर्शिका प्रकाशन!* *महापुरूषांना अभिवादन,विविध बळींना श्रध्दांजली.नियुक्तीपत्र,ओळखपत्रांचे वितरण*

Loading

*लोकस्वातंत्र्यची पत्रकार चळवळ सशक्त* *लोकशाहीचे लक्षण….! अशोकभाऊ बारब्दे*

*लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा ९ वा* *विचारमंथन मेळावा मुंबईत संपन्न…दिनर्शिका प्रकाशन!*

*महापुरूषांना अभिवादन,विविध बळींना श्रध्दांजली.नियुक्तीपत्र,ओळखपत्रांचे वितरण*

*गजानन नागे सामाजिक सेवा संघ विदर्भाध्यक्ष तर विनोद चाळके कोकण- मुंबई विभागी संघटकपदावर*

*अकोला/मुंबई* – लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ हा पत्रकार आणि समाजिक कल्याणासाठी सज्ज असणारा आणि लोकशाहीचे संरक्षण करणारा एका सशक्त प्रवाह आहे.पत्रकार आणि सामाजिक हक्कांसाठी संघर्ष करणारी ही आक्रमक समाजाभिमुख संघटना आहे.अशा संघटनेला बळ देणे ही समाजाची कर्तव्य बांधिलकी असून,एक पत्रकार म्हणून मला अशा वाटचालीचा निश्चितच अभिमान आहे.असे गौरवास्पद मनोगत दादर मुंबई येथील विदर्भ वैभव मंदिर न्यासाचे अध्यक्ष व मंमत्रालयीन माजी सचिव अशोकभाऊ बारब्दे यांनी व्यक्त केले.२०२६ च्या लोकस्वातंत्र्य दिनदर्शिकेचे अतिथी आणि सभासदांचे हस्ते प्रकाशन याप्रसंगी करण्यात आले.

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा मुंबई – कोकण विभागाचा ०९ वा मासिक विचारमंथन मेळावा दादर पश्चिमेतील विदर्भ वैभव मंदिर येथे संपन्न झाला.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.या स्नेहमिलन मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी एअर इंडीयाचे सेवानिवृत्त अभियंता व लोकस्वातंत्र्य ठाणे जिल्हा संघटन प्रमुख संजय सोळंके होते. याप्रसंगी लोकस्वातंत्र्यचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम. देशमुख,पदाधिकारी अरविंदराव देशमुख,पुष्पराज गावंडे,पत्रकार विनोद मोरे,विनोद चाळके यांची विचारमंचावर प्रमुख उपस्थिती होती.याप्रसंगी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे सामाजिक अधिष्ठाण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,कर्मयोगी संत गाडगे बाबा व महापुरूषांना वंदन अभिवादन करण्यात आले.शहिद जवान,अत्त्याचारग्रस्त महिला व आत्महत्त्याग्रस्त शेतकरी बळी,दिवंगत पत्रकार,नैसर्गिक आपत्ती व अपघातातील बळी व महाराष्ट्रभूषण शिल्पकार स्व.राम सुतार यांना सामुहिक श्रध्दांजली वाहण्यात आली.
प्रास्ताविकातून संजय देशमुख यांनी संघटनेच्या लहान मोठ्यांचा सन्मान करणाऱ्या भेदभावांपडीकडील पारदर्शक समतावादी वाटचालीची माहिती देऊन मेळावे,उपक्रम व त्यातून प्रभावी संघटनाची आवश्यकता प्रतिपादित केली‌.कार्यक्रमाध्यक्ष उपस्थितांनीही शुभेच्छा व्यक्त केल्या.यावेळी कार्यक्रमाध्यक्ष संजय सोळंके यांनी खास सेवाग्रामवरून आणलेल्या चरख्यासोबत असलेल्या म.गांधीजींची प्रतिकृती संघनाध्यक्ष संजय देशभुख यांना भेट दिली.लोकस्वातंत्र्य‌‌ सामाजिक सेवा संघाच्या अध्यक्षस्थानी बेस्ट कामागार संघटनेचे सरचिटणीस व‌ विदर्भ वैभव मंदिरचे जनरल सेक्रेटरी श्री गजाननभाऊ नागे यांची तर कोकण आणि मुंबई विभागीय संघटन प्रमुख म्हणून विनोद चाळके यांच्या नियुक्तीची घोषणा करून नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.या कार्यक्रमाला,राष्ट्रीय पदाधिकारी अंबादास तल्हार,रफिक मुलानी,जगदीश प्रसाद करोतीया, संपत उजाला ए.के. पाण्डेय,अदालत भगत, विनोद चाळके,उमेश चौधरी,सौ.चौधरी,जबिना शेख,राजीव विश्वकर्मा,कमलेश कुबल,राजा आंगने, संतोष बामणे, सुहास मोरे,ओंकार चाळके (फोटोग्राफर) प्रमुख-उपस्थिती,राजेंद्र भिसे (सोलापूर )विदर्भ मंदिरचे आशिष गायकवाड यांचे मोलाचे सहकार्य होते.संचालन व आभारप्रदर्शन महाराष्ट्र संघटन प्रमुख व मंत्रालयीन समन्वयक रफिक मुलानी यांनी केले.
=================================

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *