पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांना डॉक्टरेट
![]()
पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांना डॉक्टरेट
अमळनेर प्रतिनिधी : भुषण महाजन
श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटी संचलित पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयातून दोन विद्यार्थ्यांना एचडी प्रदान झाले *सुरज नंदलाल पाटील* यांनी समाजकार्याच्या पद्धती व त्यांचा जळगाव जिल्ह्यातील समाज उपयोगीता या विषयावर तसेच *भूपेंद्र अमृत गवळे* यांनी धुळे जिल्ह्यातील आदिवासी महिलांचे शैक्षणिक समस्या बद्दलचे अध्ययन केले या दोघेही विद्यार्थ्यांना *डॉ. जगदीश शंकर सोनवणे* संशोधन मार्गदर्शक म्हणून लाभले
सदर दोघेही विद्यार्थी राजस्थान विद्यापीठातून डॉक्टरेट झाले असून श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटी संचलित पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी एस पाटील सर तसेच चेअरमन अभिजीत भाऊ भांडारकर संस्थापक चेअरमन माननीय सुभाष दादाजी भांडारकर यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या तसेच समाजकार्य महाविद्यालयाचे डॉ. श्वेता वैद्य, डॉ. अस्मिता सर्वया डॉ. अनिता खेडकर डॉ. भरत खंडागळे डॉ. सागराराज चव्हाण प्रा.धनराज ढगे श्री अमृत गवळे, किशोर माळी, वनश्री बैसाणे, तेजस्विनी पाटील ,जानवी पाटील हे देखील उपस्थित होते.

