शेतीला उद्योग दर्जा दिल्याशिवाय शेतकरी आत्महत्त्या थांबणार नाहीत- प्रकाश पोहरे*  *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा ५२ व्या मासिक विचार मंथन मेळावा संपन्न प्रकाश पोहरे,प्रा.डॉ.ममता इंगोले,कल्पना गोरले,धनंजय मिश्रा सन्मानित!*
1 min read

शेतीला उद्योग दर्जा दिल्याशिवाय शेतकरी आत्महत्त्या थांबणार नाहीत- प्रकाश पोहरे* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा ५२ व्या मासिक विचार मंथन मेळावा संपन्न प्रकाश पोहरे,प्रा.डॉ.ममता इंगोले,कल्पना गोरले,धनंजय मिश्रा सन्मानित!*

Loading

*शेतीला उद्योग दर्जा दिल्याशिवाय शेतकरी आत्महत्त्या थांबणार नाहीत- प्रकाश पोहरे*

*लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा ५२ व्या मासिक विचार मंथन मेळावा संपन्न प्रकाश पोहरे,प्रा.डॉ.ममता इंगोले,कल्पना गोरले,धनंजय मिश्रा सन्मानित!*

*महापुरुष अभिवादन,शहिद,दिवंगत पत्रकार व विविध सामुहिक बळी व महाराष्ट्रभूषण शिल्पकार राम सुतार यांना श्रध्दांजली…नियुक्तीत्र- ओळखपत्र वितरण!*

*प्रा.डॉ.किरण वाघमारे विदर्भ अध्यक्ष तर राजेश खारोडे विदर्भ संघटन प्रमुख म्हणून व महेन्द्र काळे अमरावती जिल्हा ग्रामीण अध्यक्ष म्हणून नियुक्त*

*अकोला-* विदर्भाच्या ११ जिल्ह्यांमध्ये दररोज १४ शेतकरी आत्महत्यांच्या मार्गाने आपली आयुष्ये संपवित आहेत,त्या ईतरत्रही शेतकरी मरत आहेत.शेतकरी आणि समाज जीवनाचे प्रश्न ईतके भयंकर वाढलेले आहेत की कशा कशावर बोलावं आणि लिहावं ही फार विदारक अडचण आहे.शेतकरी आणि शेतीक्षेत्रासाठी मलमपट्ट्यांपेक्षा कायमस्वरूपी उपाययोजना केल्याशिवाय शेतकरी,श्रमिक आणि सर्वसामान्न्य सुखी होणार नाहीत.७२ हजाराची कर्जमाफी झाली परंतू त्यामुळे फक्त बॅंका तरल्या शेतकरी नाहीत.ही परिस्थिती बदलण्यासाठी शेतीला उद्योगाचा दर्जा दिला पाहिजे असे महत्वपूर्ण वास्तवतावादी प्रतिपादन भारतीय किसान संघ- परिसंघ (शिफा) व वृत्तपत्रांच्या ईलना या राष्ट्रीय संटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांनी केले.
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचा ५२ वा नियमित मासिक विचारमंथन मेळावा जैन रेस्ट्रो,जठारपेठ येथे नुकताच संपन्न झाला यावेळी अध्यक्षपदावरून ते बोलत होते.ज्येष्ठ साहित्यिका प्रा‌.डॉ.ममता इंगोले,ह्या प्रमुख अतिथी तर प्रा.डॉ.कल्पना गोरले,पत्रकार,सुत्रसंचालक धनंजय मिश्रा, प्रा.डॉ.संतोष हुशे व लोकस्वातंत्र्यचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख यांची विचारमंचावर प्रमुख उपस्थिती होती.यावेळी सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी संत गाडगेबाबा यांना वंदन-अभिवादन करण्यात आले.देशातील शहिद जवान,आत्महत्त्याग्रस्त महिला,आत्महत्त्याग्रस्त शेतकरी,दिवंगत पत्रकार , आपत्ती व अपघातग्रस्त तथा महाराष्ट्रभूषण शिल्पकार स्व.राम सुतार यांना याप्रसंगी सामुहिक श्रध्दांजली वाहण्यात आली.

याप्रसंगी बोलतांना प्रा‌.डॉ.ममताताई इंगोले यांनी पत्रकार हे भावनांचे शिस्तबध्द वादळ आणि समाजाला जगवणारी नवसंजीवनी असते.पत्रकार आणि पोलिस आहेत म्हणून समाज जीवंत आहे. हे वास्तव आपल्या काव्यबध्द शैलीतून विषद केले.संजय देशमुख यांनी प्रास्ताविकानतून प्रकाश पोहरे हे अंतर्मनातून समजून घेण्याचे व्यक्तिमत्व त्यांच्या उत्तूंग कार्याचा गौरव करून संघटनेची वाटचाल स्पष्ट केली.आगामी ६ जानेवारीचा पत्रकार दिन ” समाजाला अपेक्षित असणारा पत्रकार कसा असावा?” या विषयावर परिसंवाद आणि पत्रकार भावांना सन्मानित करून साजरा करणार असल्याचे यावेळी सांगीतले. कल्पना गोरले आणि धनंजय मिश्रा यांनी सुध्दा प्रकाशभाऊ आणि लोकस्वातंत्र्यच्या वाटचालीचा व “लोकस्वातंत्र्य” या अर्थपूर्ण उदात्त नावाचा गौरव करून शुभेच्छा व्यक्त केल्या.

यावेळी प्रकाश पोहरे,ममता इंगोले,कल्पना थोरात व धनंजय मिश्रा यांना सन्मापत्र, स्मृतीचिन्ह,शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.प्रा.मोहन काळे यांनी सन्मानपत्रांचे वाचन केले. विचारमंथन सभासद सहयोग सन्मानपत्र,नियुक्तीपत्र,व ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले.लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या विदर्भ अध्यक्षपदावर प्रा.डॉ.किरण वाघमारे,विदर्भ संघटन प्रमुख राजेश खारोडे तर अमरावती जिल्हा ग्रामीण अध्यक्ष म्हणून महेन्द्र काळे यांच्या नियुक्तीची घोषणा संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय देशमुख यांनी यावे केली.
या कार्यक्रमाला राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रदिप खाडे,सचिव राजेन्द्र देशमुख,अंबादास तल्हार,सो.जया भारती,संतोष धरमकर,अभि.विनायक पांडे,सागर लोडम,पंजाबराव वर,प्रा.महादेव लूले,दिलीप नवले,मनोहर मोहोड,दिवाकर गावंडे,श्रीकृष्ण माळी,रावसाहेब देशमुख,महेन्द्र काळे (अमरावती),किशोर मुटे (हिंगणघाट)प्रा.मोहन काळे, के‌.व्ही‌.देशमुख,प्रा‌.प्रकाश डवले,सुरेश पाचकवडे,सतिश देशमुख,आशिष वानखडे,सौ.नयना देशमुख,सौ.वैशाली देशमुख,अॕड.संकेत देशमुख,प्रा‌.विजय काटे,प्रा.विजयराव बाहकर,सौ.दिपाली बाहेकर,अनिल मावळे,नरेन्द्र देशमुख,प्रा.डॉ.बाळकृष्ण खंडारे,अॕड.मुरलीधर इंगळे, डॉ.मनोहर घुगे, डॉ.अशोक शिरसाट,आत्माराम शेळके,गजानन थोरात,धारेराव देशमुख,वसंतराव देशमुख,कृष्णा चव्हाण,गजानन चव्हाण,गजानन मुऱ्हे,के.एम‌.देशमुख,प्रशांत कोले,रविन्द्र देशमुख,गजानन वानखडे,शिवचरण डोंगरे,गजाभाऊ देशमुख,रमेश समुद्रे,अमित इंगळे,एकनाथ पाखरे, आकाश हरणे,विशाल नाईक,दिपक शिरसाट,भावेश हुशे,फुलचंद वानखडे,देवानंद गवई,अॕड.प्रजानंद उपर्वट,रवी पाटणे,अजय वानखडे,व अनेक पत्रकार उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचलन सौ.जया भारती व प्रा.महादेव लूले यांनी केले.सहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *