बदरखेत महिलांसाठी उद्योजकता अभियान व प्रशिक्षण शिबिर,  * जिल्हा उद्योग केंद्र जळगाव व राष्ट्रवादी काँग्रेस युवती विभागीय अध्यक्षा अभिलाषा रोकडे यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम ; महिलांना व्यवसायासाठी मार्गदर्शन, स्नेहभोजन व भेटवस्तूंचे वाटप
1 min read

बदरखेत महिलांसाठी उद्योजकता अभियान व प्रशिक्षण शिबिर, * जिल्हा उद्योग केंद्र जळगाव व राष्ट्रवादी काँग्रेस युवती विभागीय अध्यक्षा अभिलाषा रोकडे यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम ; महिलांना व्यवसायासाठी मार्गदर्शन, स्नेहभोजन व भेटवस्तूंचे वाटप

Loading

बदरखेत महिलांसाठी उद्योजकता अभियान व प्रशिक्षण शिबिर

* जिल्हा उद्योग केंद्र जळगाव व राष्ट्रवादी काँग्रेस युवती विभागीय अध्यक्षा अभिलाषा रोकडे यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम ; महिलांना व्यवसायासाठी मार्गदर्शन, स्नेहभोजन व भेटवस्तूंचे वाटप

नगरदेवळा :- ग्रामीण भागातील महिलांमध्ये उद्योजकता, स्वयंरोजगार व गृह उद्योगांकडे कल वाढावा या उद्देशाने जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव आणि राष्ट्रवादी काँग्रेस युवती विभागीय अध्यक्षा अभिलाषा भिला रोकडे यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे बदरखे (ता. पाचोरा) येथे महिलांसाठी उद्योजकता अभियान व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या उपक्रमांतर्गत महिलांना नवीन व्यवसाय संधी, गृह उद्योग, स्वयंरोजगार, प्रशिक्षण, बँक कर्ज, शासकीय योजना, अनुदान व सबसिडी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांनी अनुभवाधारित मार्गदर्शन केले.

कार्यक्रमादरम्यान अभिलाषा रोकडे यांच्या वतीने उपस्थित महिलांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते तसेच सहभागी महिलांना आकर्षक भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

शिबिरात तुषार पाटील, वैभव शिंदे, विनोद पाटील, लक्ष्मी मराठे, शैलेंद्र बोरसे यांनी मार्गदर्शन करतांना ग्रामीण महिलांनी उपलब्ध साधनसंपत्तीचा योग्य वापर करून उद्योग, प्रक्रिया उद्योग, बचत गट आधारित व्यवसाय, लघुउद्योग कसे सुरू करावेत, याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच व्यवसाय सुरू करतांना आवश्यक असणाऱ्या परवानग्या, नोंदणी प्रक्रिया आणि बाजारपेठ उपलब्धता यावरही प्रकाश टाकण्यात आला.

या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांमध्ये व्यवसायाची आवड निर्माण होऊन गृह उद्योगांकडे सकारात्मक दृष्टीकोन तयार होत असून, भविष्यात महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *