मंदिरांच्या मालमत्तेवरील मुद्रांक, नोफ्लदणी शुल्क माफ करावे*  *महाराष्ट्र मंदिर महासंघातर्फे अमळनेर येथे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन*
1 min read

मंदिरांच्या मालमत्तेवरील मुद्रांक, नोफ्लदणी शुल्क माफ करावे* *महाराष्ट्र मंदिर महासंघातर्फे अमळनेर येथे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन*

Loading

*मंदिरांच्या मालमत्तेवरील मुद्रांक, नोफ्लदणी शुल्क माफ करावे*

*महाराष्ट्र मंदिर महासंघातर्फे अमळनेर येथे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन*

*अमळनेर प्रतिनिधी* – राज्य महाराष्ट्र मंदिर महासंघातर्फे मंदिरांच्या मालमत्तेवरील मुद्रांक व नोफ्लदणी शुक्ल माफ करण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर येथील मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वस्तांनी गुरुवार, दि. 11 डिसेंबर रोजी प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे, की राज्यातील मंदिरांना दान रूपाने मिळणाऱ्या आणि मंदिराने खरेदी केलेल्या जमिनीवरील मुद्रांक शुल्क पूर्णतः माफ करावे. मंदिर महासंघ मंदिराचे संरक्षण करणे, त्यांच्यावर होणाऱ्या हल्ल्यांविरुद्ध कायदेशीर लढा देणे, मंदिर परिसरामध्ये मद्यमान आणि मांसाहार यासारख्या गोष्टींना प्रतिबंध करणे, तसेच मंदिरांमध्ये वस्त्रसंहिंता लागू करणे, हिंदुत्वाची आध्यात्मिक व सांस्कृतिक ओळख जपण्यासाठी जनजागृती करणे, मंदिरांच्या सरकारी करणाला विरोध करणे, प्रत्येक मंदिराचे व्यवस्थापन फक्त आणि फक्त हिंदू विश्वस्तांच्याच हाती असावे, अशी आग्रही भूमिका ठेवत महत्वपूर्ण कार्य निरंतर करीत आहे. त्यात मंदिर विश्वस्त, पुजारी आणि भाविकांना एकत्रित आणून राज्यस्तरावर मंदिरांच्या हितासाठी अहोरात्र काम करत आहे. त्यामुळे मंदिरांनी खरेदी केलेल्या जमिनीवर मुद्रांक व नोफ्लदणी शुल्क माफ करून आम्हास उपकृत करावे, ही आग्रही विनंती.
याप्रसंगी मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, विश्वस्त अनिल अहिरराव, मंगल सेवेकरी आर. टी. पाटील, श्रीमती यू. एन. शहा, नीलेश महाजन, बाळा पवार, जनसंपर्क अधिकारी शरद कुळकर्णी, रजनीकांत पाटील, मुख्य पुरोहित शुभम वैष्णव, तुषार दीक्षित, यश जोशी, गोपाळ पाठक आदी उपस्थित होते. निवेदनावर कोअर कमिटीचे सदस्य तथा मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांची स्वाक्षरी आहे. निवेदनाच्या प्रती पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, खासदार स्मिताताई वाघ, आमदार अनिलदादा पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.
दरम्यान, वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थानचे अध्यक्ष सुभाष चौधरी, संजय शुक्ल, प्रकाश शहा, हनुमान मंदिराचे विश्वस्त राजू देसले, फरशी रोडवरील महादेव मंदिराचे विश्वस्त भावेश चौधरी, वाडी संस्थानचे विश्वस्त बापूसाहेब देशमुख, उदय देशपांडे, रमेश जोशी, गजानन महाराज मंदिराचे आर. बी. पवार आदींनीही प्रांताधिकारी भंगाळे यांना निवेदन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *