प्रभाग 3 ‘अ’ मध्ये महिला नेतृत्वाची नवी ओळख – पूजा शिंदे चर्चेत, विकास आणि सेवा मार्गदर्शक
![]()
प्रभाग 3 ‘अ’ मध्ये महिला नेतृत्वाची नवी ओळख – पूजा शिंदे चर्चेत, विकास आणि सेवा मार्गदर्शक
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग 3 ‘अ’ (अनुसूचित जमाती महिला राखीव) मधून शिवसेना (एकनाथ शिंदे गट) तर्फे उमेदवार पूजा रमेश शिंदे (पूजा सिंधी) यांची चर्चा दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे.
उच्चशिक्षित, कौशल्यसंपन्न आणि दोन समाजांना जोडणाऱ्या या तरुण उमेदवाराकडे महिला नेतृत्वाचा नवा पर्याय म्हणून पाहिले जात आहे. B.A., M.A., M.Sc., B.Ed तसेच टायपिंग, स्टेनो आणि MS-CIT सारखा तांत्रिक अनुभव असलेली पूजा शिंदे, ‘लाडकी बहीण’ योजना प्रभावीपणे राबविण्यावर लक्ष केंद्रीत करत आहेत, आणि पारधी व सिंधी समाजांचा मोठा पाठिंबा त्यांच्या पाठीशी आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, शैक्षणिक भक्कमपणा, सेवा वृत्ती आणि पारदर्शक कामकाज यामुळे पूजा शिंदे प्रभाग 3 ‘अ’ मधील प्रभावी आणि विजयी दावेदार ठरत आहेत.
प्रभागातील महिला आणि युवा यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे शिबिरे आयोजित करून शासनाच्या योजना थेट पोहोचवण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला आहे. तसेच, प्रभाग सुरक्षित, सुंदर आणि विकसित करण्यासाठी ओपन प्लेस सुशोभीकरण, रस्ते व गटारी या मुद्यांवर लक्ष देण्यात येणार आहे. महिला सक्षमीकरणावर विशेष प्राधान्य दिले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शहरातील मतदारांच्या अपेक्षांनुसार, पूजा शिंदेचे नेतृत्व प्रभाग 3 ‘अ’ मधील विकास आणि सामाजिक एकात्मतेचा नवा मानक ठरेल, अशी दृष्टी अनेक नागरिक व्यक्त करत आहेत.

