डॉ. दत्ता विघावे यांची वीरों की “शौर्य गाथा” पुस्तकात निवड. — राष्ट्रीय स्तरावर मानाचा सन्मान**
1 min read

डॉ. दत्ता विघावे यांची वीरों की “शौर्य गाथा” पुस्तकात निवड. — राष्ट्रीय स्तरावर मानाचा सन्मान**

Loading

डॉ. दत्ता विघावे यांची वीरों की “शौर्य गाथा” पुस्तकात निवड.
— राष्ट्रीय स्तरावर मानाचा सन्मान**

मुंबई : – साहित्य, क्रिडा, पर्यावरण, शिक्षण, जनजागृती आणि राष्ट्रहितासाठी सतत कार्यरत असलेल्या डॉ. दत्ता सिंधुताई बाबूलाल विघावे यांची निवड प्रतिष्ठित वीरों की ‘शौर्यगाथा’ या राष्ट्रीय पुस्तकामध्ये करण्यात आली आहे. देशभरातील मान्यवर समाजसेवक, शौर्यपदक प्राप्त वीर, लष्करी अधिकारी, शिक्षक, वैचारिक नेते आणि प्रेरणादायी व्यक्तींना या पुस्तकात स्थान मिळते. यामध्ये डॉ. विघावे यांचा समावेश होणे हा त्यांच्या दीर्घकालीन सार्वजनिक कार्याची राष्ट्रीय दखल मानली जात आहे.

या पुस्तकामध्ये निवडलेल्या व्यक्तींमध्ये पाकिस्तानविरूद्ध केलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी झालेले विंग कमांडर वर्तिका सिंह, कर्नल सोफिया कुरेशी, कॅप्टन अनिल नय्यर, तसेच विविध क्षेत्रातील नामांकित दिग्गजांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे श्रीरामपूर सारख्या ग्रामीण भागातून आलेल्या डॉ.दत्ता विघावे यांना मिळालेला हा सन्मान सर्वांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

डॉ. विघावे यांनी शिक्षण, सामाजिक बांधिलकी, साहित्य-लेखन, क्रीडा पत्रकारिता, आंदोलनात्मक कार्य, पर्यावरण आणि युवकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी दीर्घकाळ योगदान दिले आहे. ग्रामीण भागातील शैक्षणिक परिस्थिती, सामाजिक प्रश्न, तसेच क्रिकेट विश्लेषणाच्या क्षेत्रातील त्यांच्या अभ्यासपूर्ण लेखनाची देशभर दखल घेतली जाते. या सर्व योगदानातून ते व्यापक जनमानसाशी जोडले गेले आहेत.

“हा सन्मान त्यांच्या कामाचे मूल्यांकन नसून, समाजासाठी आणखी अधिक जबाबदारीने कार्य करण्याची प्रेरणा आहे,” अशी प्रतिक्रिया डॉ. विघावे यांनी दिली.

वीरों की “शौर्यगाथा’’ हे पुस्तक देशातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या प्रेरणादायी कार्याचा गौरव करणारे एक महत्वाचे संपादित संकलन मानले जाते. याच पुस्तकात जेष्ठ हिंदी कवी व सेवानिवृत्त कॅप्टन नरेंद्र कुमार सिध्दू यांनी प्रत्येक सहभागी व्यक्तींच्या सन्मानार्थ कविताही लिहिल्या आहे. डॉ. विघावे यांच्या समावेशामुळे महाराष्ट्रातील उदयोन्मुख लेखक, सामाजिक कार्यकर्ते आणि युवा पिढीसाठी हे विशेष प्रेरणादायी ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *