अनुभव, विकास आणि विश्वासाची नवी लाट — प्रभाग 16 ‘अ’ मध्ये राजेश बापू पुन्हा सज्ज!
![]()
अनुभव, विकास आणि विश्वासाची नवी लाट — प्रभाग 16 ‘अ’ मध्ये राजेश बापू पुन्हा सज्ज!
अमळनेर प्रतिनिधी
प्रभाग 16 अ च्या उज्ज्वल भविष्यासाठी पुन्हा एकदा अनुभवसंपन्न आणि विश्वासू नेतृत्व पुढे आले आहे. अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये माजी नगरसेवक पाटील राजेश शिवाजीराव उर्फ ‘राजेश बापू’ यांना भाजप–राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत समर्थन मिळाले असून, अमळनेर तालुका शहर विकास आघाडीच्या पाठबळाखाली ते उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहेत.
माजी नगरसेवक म्हणून त्यांनी प्रभागात केलेल्या ठोस आणि लोकाभिमुख कामांत आर.के. नगर सोसायटीतील रस्ते–गटार विकासकामे, नवीन भालेराव नगर ओपन प्लेस सुशोभिकरण, पाटील गडी परिसरात काँक्रिटीकरण, गुरुकृपा कॉलनीतील सातत्यपूर्ण रस्ते विकासकाम, रवी नगरमधील कम्युनिटी हॉल उभारणी, 24 तास पाणीपुरवठा आणि आधुनिक हायमास्ट सोलर लाईट्स अशा अनेक उपक्रमांचा समावेश आहे.
आगामी काळासाठी त्यांनी प्रभाग विकासाचा ठोस रोडमॅपही जाहीर केला आहे. यात आर.के. नगर मुख्य गेट रस्ता काँक्रिटीकरण, गुरुकृपा–विद्याविहार–सुरभी कॉलनी रस्ते आधुनिकीकरण, संताजी नगर रस्ते–गटारी–वीज सुविधा सुधारणा, आर.के. नगर ओपन प्लेस सुशोभिकरण, मुंदडा नगर व विद्याविहार मुख्य रस्त्यांचे रुंदीकरण तसेच सर्व बिघडलेले रस्ते नव्याने तयार करण्याचा समावेश आहे.
राजेश बापू म्हणाले,
“ही माझी उमेदवारी नाही… हा प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प आहे. नागरिकांचे प्रश्न तातडीने सोडवून, सुविधा दारात आणणे हेच माझे ध्येय आहे.”
प्रभागातील नागरिकांमध्ये त्यांच्या कामाची ठोस छाप असून, राजेश बापू पुन्हा प्रचंड मतांनी विजयी होतील, असा ठाम विश्वास स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.

