जितेंद्र ठाकूरसह आघाडीच्या सर्व उमेदवारांना मिळाले जाहीर समर्थन; प्रचारात वाढला उत्साह!
1 min read

जितेंद्र ठाकूरसह आघाडीच्या सर्व उमेदवारांना मिळाले जाहीर समर्थन; प्रचारात वाढला उत्साह!

Loading

जितेंद्र ठाकूरसह आघाडीच्या सर्व उमेदवारांना मिळाले जाहीर समर्थन; प्रचारात वाढला उत्साह!

अमळनेर प्रतिनिधी: शहराच्या विकासात ठोस योगदान देणाऱ्या अमळनेर तालुका व शहर विकास आघाडीच्या उमेदवारांना शहरभर मोठा प्रतिसाद मिळत आहे. काल शहरातील चार प्रमुख संघटनांनी लेखी पत्राद्वारे आघाडीला जाहीर पाठिंबा दिला, ज्यामुळे उमेदवारांचे जनसंपर्क आणि विश्वास दोन्ही वाढले आहेत.

अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील मोठ्या संघटनापैकी एक असलेली दि अमळनेर मार्केट यार्ड आडत असोसिएशन यांनी शहर विकासाचे व्हिजन डोळ्यावर ठेवून काम करणाऱ्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जितेंद्र ठाकूर आणि इतर सर्व उमेदवारांना पाठिंबा दर्शविला. तसेच, आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या आमदार अनिल पाटील, खासदार स्मिता वाघ, साहेबराव पाटील, माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील यांच्या पाठीशी राहण्याचा निर्धार त्यांनी लेखी पत्रात व्यक्त केला.

यासोबतच अमळनेर गुमास्ता कामगार असोसिएशन आणि राष्ट्रीय हमाल मापाडी कामगार युनियन यांनी देखील आघाडीला लेखी पाठिंबा जाहीर केला. शहरातील कामगार वर्गाचा हा मोठा पाठिंबा उमेदवारांना विजयाकडे नेणारा ठरत असून, प्रचारात त्यांचे मनोबल अधिक वाढले आहे.

त्याचबरोबर, वासुदेव जोशी गोंधळी समाज पंच मंडळ यांनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जितेंद्र ठाकूर, प्रभाग क्रमांक आठमधील उमेदवार ऍड चेतना पाटील आणि आघाडीच्या इतर सर्व उमेदवारांना लेखी समर्थन जाहीर केले आहे. शहर विकास आघाडीचे तुल्यबळ उमेदवार आणि विकासाभिमुख भूमिकेमुळे समाज प्रतिनिधी, व्यावसायिक, कामगार आणि नागरिकांचे मोठे पाठबळ प्रचारादरम्यान लाभत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *