अमळनेर येथील आर्मी स्कूलमध्ये करुणा इंटरनॅशनल क्लबची स्थापना
![]()
अमळनेर येथील आर्मी स्कूलमध्ये करुणा इंटरनॅशनल क्लबची स्थापना
अमळनेर – येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘विश्व मांसाहार निषेध दिन’ अर्थात ‘जागतिक शाकाहारी दिन’ साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधत शाळेमध्ये ‘करुणा इंटरनॅशनल क्लब’ची स्थापना करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये करुणा, अहिंसा आणि पर्यावरण-जागर यांचा संदेश देण्यात आला.
करुणा क्लब चे उद्घाटन प्राचार्य बी. डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुभेदार मेजर श्रीराम पाटील, एस. पी. अहिरे, एस. डी. पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. करुणा इंटरनॅशनल क्लबचे प्रमुख म्हणून उमेश काटे तर समन्वयक म्हणून शिवाजी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. बी डी पाटील यांनी विद्यार्थी जीवनातील शाकाहाराचे महत्त्व, पर्यावरण संवर्धन आणि करुणामूलक जीवनशैलीबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उमेश काटे यांनी केले. तसेच कार्यक्रमासाठीचा फलकलेखन टी. के. पावरा यांनी सुंदररीत्या साकारला. शिवाजी पाटील यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप करण्यात आले. उपस्थित विद्यार्थ्यांनी शाकाहार, प्राणिमात्रांविषयीची करुणा आणि आरोग्यपूरक जीवनशैली स्वीकारण्याचा संकल्प केला. या कार्यक्रमास सर्व शिक्षक, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
——–
अमळनेर – ‘करुणा इंटरनॅशनल क्लब’च्या उदघाटन प्रसंगी उपस्थित प्राचार्य बी डी पाटील व सर्व शिक्षक मान्यवर

