प्रभाग 16 अ साठी अनुभवसंपन्न नेतृत्व पुन्हा पुढे; राजेश बापू देणार विकासाची ग्वाही”
1 min read

प्रभाग 16 अ साठी अनुभवसंपन्न नेतृत्व पुन्हा पुढे; राजेश बापू देणार विकासाची ग्वाही”

Loading

प्रभाग 16 अ साठी अनुभवसंपन्न नेतृत्व पुन्हा पुढे; राजेश बापू देणार विकासाची ग्वाही”

अमळनेर प्रतिनिधी
प्रभाग 16 अ च्या उज्ज्वल भविष्यासाठी अनुभवसंपन्न आणि विश्वासू नेतृत्व पुन्हा पुढे आले आहे. अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये माजी नगरसेवक पाटील राजेश शिवाजीराव उर्फ ‘राजेश बापू’ यांना भाजप–राष्ट्रवादी काँग्रेसचे भक्कम पाठबळ मिळाले असून, अमळनेर तालुका शहर विकास आघाडीच्या समर्थनाखाली ते उमेदवार म्हणून उभे आहेत.
माजी नगरसेवक म्हणून त्यांनी प्रभागात केलेल्या ठोस कामांमध्ये आर.के. नगर सोसायटी रस्ते–गटारांचे विकासकाम, भालेराव नगरातील ओपन प्लेस सुशोभिकरण, पाटील गडी परिसरातील काँक्रिटीकरण, गुरुकृपा कॉलनीतील सातत्यपूर्ण रस्त्यांचे विकास, रवी नगरमध्ये कम्युनिटी हॉल बांधणे, तसेच 24 तास पाणीपुरवठा आणि हायमास्ट सोलर लाईट्स योजना यांचा समावेश आहे.
आगामी काळात त्यांनी आर.के. नगरचा मेन गेट रस्ता काँक्रिटीकरण, गुरुकृपा–विद्याविहार–सुरभी कॉलनी रस्त्यांचे आधुनिकीकरण, संताजी नगर रस्ते–गटारी–वीज व्यवस्थेचे सुधारणा, आर.के. नगर ओपन प्लेस सुशोभिकरण, मुंदडा नगर व विद्याविहार मुख्य रस्त्यांचे रुंदीकरण, तसेच बिघडलेले सर्व रस्ते नव्याने तयार करणे यांसारखी कामे प्राधान्याने राबवण्याचा निश्चय व्यक्त केला आहे.
राजेश बापू म्हणाले, “ही माझी उमेदवारी नाही, हा प्रभागाच्या विकासाचा संकल्प आहे. प्रभागातील प्रत्येक प्रश्न तातडीने सोडवण्याचे आणि नागरिकांना सुविधा मिळवून देण्याचे माझे उद्दिष्ट आहे.”
स्थानिक नागरिकांनीही प्रभागातील कामकाजावर त्यांचा विश्वास व्यक्त करत, राजेश बापू पुन्हा प्रचंड मतांनी विजयी होऊन प्रभागासाठी कार्य करण्यास तयार असल्याचे मत दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *