विकासाचा शब्द… प्रभागाचा विश्वास… पुन्हा राजेश बापूच!  — पाटील राजेश शिवाजीराव (राजेश बापू), प्रभाग 16 अ उमेदवार
1 min read

विकासाचा शब्द… प्रभागाचा विश्वास… पुन्हा राजेश बापूच! — पाटील राजेश शिवाजीराव (राजेश बापू), प्रभाग 16 अ उमेदवार

Loading

विकासाचा शब्द… प्रभागाचा विश्वास… पुन्हा राजेश बापूच!

— पाटील राजेश शिवाजीराव (राजेश बापू), प्रभाग 16 अ उमेदवार

अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
प्रभाग 16 अ च्या उज्ज्वल भविष्यासाठी अनुभवसंपन्न आणि विश्वासू नेतृत्व पुन्हा पुढे आले आहे. अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये माजी नगरसेवक पाटील राजेश शिवाजीराव उर्फ ‘राजेश बापू’ यांना भाजप–राष्ट्रवादी काँग्रेसचे भक्कम पाठबळ मिळाले असून, अमळनेर तालुका शहर विकास आघाडीच्या समर्थनाखाली ते उमेदवार म्हणून उभे आहेत.
माजी नगरसेवक म्हणून त्यांनी प्रभागात केलेल्या ठोस कामांमध्ये आर.के. नगर सोसायटी रस्ते–गटारांचे विकासकाम, नवीन भालेराव नगरातील ओपन प्लेस सुशोभिकरण, पाटील गडी परिसरात काँक्रिटीकरण, गुरुकृपा कॉलनीतील सातत्यपूर्ण रस्त्यांचे विकासकाम, रवी नगरमध्ये कम्युनिटी हॉल बांधणे, तसेच 24 तास पाणीपुरवठा आणि हायमास्ट सोलर लाईट्स योजना यांचा समावेश आहे.
आगामी काळात त्यांनी आर.के. नगरचा मेन गेट रस्ता काँक्रिटीकरण, गुरुकृपा–विद्याविहार–सुरभी कॉलनी रस्त्यांचे आधुनिकीकरण, संताजी नगर रस्ते–गटारी–वीज व्यवस्थेचे सुधारणा, आर.के. नगर ओपन प्लेस सुशोभिकरण, मुंदडा नगर व विद्याविहार मुख्य रस्त्यांचे रुंदीकरण, तसेच बिघडलेले सर्व रस्ते नव्याने तयार करणे यांसारखी कामे प्राधान्याने राबवण्याचा निश्चय व्यक्त केला आहे.
राजेश बापू म्हणाले, “ही माझी उमेदवारी नाही, हा प्रभागाच्या विकासाचा संकल्प आहे. प्रभागातील प्रत्येक प्रश्न तातडीने सोडवण्याचे आणि नागरिकांना सुविधा मिळवून देण्याचे माझे उद्दिष्ट आहे.”
प्रभागातील लोकांच्या मतांचा आधार घेत, राजेश बापू पुन्हा प्रचंड मतांनी विजयी होऊन प्रभागासाठी कार्य करण्यास तयार आहेत, असा विश्वास स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *