अमळनेरमध्ये विकासाचा नवा चेहरा – जितेंद्र ‘जितू’ ठाकूर यांना जनतेचा उस्फूर्त विश्वास!”
![]()
“अमळनेरमध्ये विकासाचा नवा चेहरा – जितेंद्र ‘जितू’ ठाकूर यांना जनतेचा उस्फूर्त विश्वास!”
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. या पार्श्वभूमीवर अमळनेर तालुका शहर विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार जितेंद्र हरिश्चंद्र ठाकूर (जितू ठाकूर) यांच्या प्रचाराला मिळणारा जबरदस्त प्रतिसाद सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
साध्या, सामान्य कुटुंबातून मोठ्या संघर्षातून पुढे आलेले व पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक वर्षे अन्यायाविरोधात निर्भीडपणे लढणारे, सर्वसामान्यांचा आवाज बनून काम करणारे जितू ठाकूर हे शहरातील प्रत्येक घटकात लोकप्रिय ठरत आहेत.
शहरातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या प्रचारादरम्यान नागरिकांचा स्वयंस्फूर्त, प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. तरुणाई त्यांच्याशी जोडली जात आहे, महिलांमधून भरभरून पाठिंबा मिळत आहे, ज्येष्ठ नागरिक मार्गदर्शन करत आहेत… आणि व्यापारी तसेच कामगार वर्गही त्यांना एक विश्वासू चेहरा म्हणून पाहत आहे.
मनाने श्रीमंत – सर्वांचा सहकारी नेतृत्व
जितू ठाकूर यांची जमेची बाजू म्हणजे त्यांचा सहज, साधा आणि माणुसकीने भरलेला स्वभाव. गरज पडल्यास कोणत्याही वेळी उपलब्ध राहून मदतीसाठी धावून येणारे, प्रत्येकाशी आपुलकी जपणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या भोवती असलेला तरुणांचा मोठा गोतावळा, सर्वांशी जुळून जाण्याची क्षमता आणि काम करण्याची प्रामाणिक वृत्ती यामुळेच शहरातील नागरिकांना त्यांच्यात भविष्यातील दृढ, स्पष्ट आणि संवेदनशील नेतृत्व दिसत आहे.
“अमळनेर बदलूया… आपल्यातीलच माणसाला संधी देऊया!” — हा नारा आता शहरभर घुमू लागला आहे. सामान्यांमधून पुढे आलेल्या नेतृत्वाला प्रचंड पसंती मिळत असून, मतदारांचा कल स्पष्ट दिसू लागला आहे.
सर्वांना सहज उपलब्ध असणाऱ्या नेतृत्वालाच पसंती…
सध्या नागरिकांमध्ये असा ठाम सूर ऐकू येत आहे की, अमळनेरला हवे आहे जवळचे, उपलब्ध आणि जबाबदार नेतृत्व — जे समस्यांना भिडेल, विकासाची नवी दिशा देईल आणि अमळनेरचा चेहरा बदलण्यासाठी खऱ्या अर्थाने काम करेल. या अपेक्षा जितू ठाकूर पूर्ण करतील, असा जनतेचा विश्वास अधिक दृढ होत आहे.
शहराच्या विकासासाठी, सर्वसमावेशक कामांसाठी आणि सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी लढणारे नेतृत्व देण्याची तयारी जितू ठाकूर यांनी दाखविल्याने त्यांची दावेदारी दिवसेंदिवस अधिक बळकट होताना दिसत आहे.
अमळनेरच्या राजकारणात आता एक नवीन वायूबदल जाणवत आहे –
विश्वासाचा, विकासाचा आणि सर्वसामान्यांच्या नेतृत्वाचा!



