प्रभाग 13 ब मध्ये जनतेसाठी पारदर्शक नेतृत्व – सुनिल दयाराम महाजन यांच्या प्रतिज्ञापत्राची चर्चा”
![]()
“प्रभाग 13 ब मध्ये जनतेसाठी पारदर्शक नेतृत्व – सुनिल दयाराम महाजन यांच्या प्रतिज्ञापत्राची चर्चा”
अमळनेर प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक 13 ब मध्ये निवडणुकीची तयारी जोरात सुरू असताना अपक्ष उमेदवार सुनिल दयाराम महाजन यांच्या पारदर्शक आणि जनहितकारी वचनांची चर्चा प्रचंड वाढली आहे. जनतेसमोर 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर दिलेल्या प्रतिज्ञापत्राने मतदारांमध्ये विश्वासाचा नवीन उत्साह निर्माण केला आहे.
स्वेच्छा सेवेनिवृत्त पोलिस हेड कॉन्स्टेबल, इतिहास विषयातील उच्चशिक्षित आणि सामाजिक कार्यात सक्रीय असलेल्या महाजन यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात खालील महत्वाचे आश्वासन दिले आहे:
- भ्रष्टाचारास कटाक्षाने विरोध; कोणताही ठेका स्वीकारणार नाही
- प्रभागातील मूलभूत सुविधांची शंभर टक्के पूर्तता
- कामात कुठलीही चूक आढळल्यास पदाचा राजीनामा देण्याची धाडसी हमी
- रस्ते, गटारी, पाणीपुरवठा, सार्वजनिक लाईट व स्वच्छतेसाठी कटिबद्ध काम
सुनिल महाजन म्हणतात, “स्वच्छ, सुंदर अमळनेर – जनतेच्या सहकार्याने उभारू, आणि प्रत्येक नागरिकाच्या हितासाठी काम करू.”
पारदर्शकता, प्रामाणिकता आणि जनतेस प्राधान्य देण्याच्या या नव्या राजकीय शैलीने प्रभाग 13 ब मध्ये मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण केले असून, चर्चेचा मुख्य विषय बनली आहे.
– प्रभाग 13 ब मधून आपला अपक्ष उमेदवार
सुनिल दयाराम महाजन

