प्रभाग 13 ब मध्ये स्वच्छ, पारदर्शक नेतृत्वाची नवी दिशा! अपक्ष उमेदवार सुनिल दयाराम महाजन यांनी दिली जनतेपुढे ठाम हमी
1 min read

प्रभाग 13 ब मध्ये स्वच्छ, पारदर्शक नेतृत्वाची नवी दिशा! अपक्ष उमेदवार सुनिल दयाराम महाजन यांनी दिली जनतेपुढे ठाम हमी

Loading

प्रभाग 13 ब मध्ये स्वच्छ, पारदर्शक नेतृत्वाची नवी दिशा!
अपक्ष उमेदवार सुनिल दयाराम महाजन यांनी दिली जनतेपुढे ठाम हमी

अमळनेर प्रतिनिधी – प्रभाग क्रमांक 13 ब मध्ये निवडणूक रंगतदार होत असताना, अपक्ष उमेदवार सुनिल दयाराम महाजन यांच्या पारदर्शक आणि जनहितवादी प्रतिज्ञापत्राची जोरदार चर्चा सुरू आहे. जनतेपुढे 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहिलेल्या आश्वासनांनी मतदारांमध्ये विश्वासाची नवी उमेद निर्माण केली आहे.
स्वेच्छा सेवेनिवृत्त पोलिस हेड कॉन्स्टेबल, इतिहास विषयातील उच्चशिक्षित, सामाजिक कार्यात पुढाकार घेणारे आणि तरुणांमध्ये सकारात्मक विचार पेरणारे महाजन यांनी दिलेल्या वचनांमध्ये भ्रष्टाचाराला ठाम विरोध, कोणत्याही प्रकारचा ठेका स्वीकारणार नाही अशी निर्भीड घोषणा, वॉर्डातील मूलभूत सुविधांची शंभर टक्के पूर्तता, तसेच कामात कुचराई आढळल्यास पदाचा राजीनामा देण्याची धाडसी ग्वाही यांचा समावेश आहे.
प्रभागातील रस्ते, गटारी, पाणीपुरवठा, रस्त्यावरील लाईट, सार्वजनिक स्वच्छता यासाठी कटिबद्ध राहण्याची घोषणा करतानाच – “स्वच्छ, सुंदर अमळनेर – जनतेच्या दबावगटाच्या मदतीने उभारू” असे ते स्पष्ट म्हणाले.
पारदर्शकता, प्रामाणिकता आणि जनतेला प्राधान्य देणारे त्यांचे प्रतिज्ञापत्र मतदारांमध्ये सकारात्मक विश्वास निर्माण करत असून, प्रभाग 13 ब मध्ये या नव्या राजकीय शैलीची जोरदार चर्चा आहे.

– आपलाच प्रभाग 13 ब मधून अपक्ष उमेदवार
सुनिल दयाराम महाजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *