तालुकास्तरीय मुल्यवर्धन प्रशिक्षण कार्यक्रम आनंददायी उपक्रमांनी संपन्न.
1 min read

तालुकास्तरीय मुल्यवर्धन प्रशिक्षण कार्यक्रम आनंददायी उपक्रमांनी संपन्न.

Loading

तालुकास्तरीय मुल्यवर्धन प्रशिक्षण कार्यक्रम आनंददायी उपक्रमांनी संपन्न.

अमळनेर प्रतिनिधी-
अमळनेर पंचायत समिती अंतर्गत,व मा.गटशिक्षणाधिकारी साहेब श्री.रावसाहेब मांगो पाटील यांच्या नेतृत्वाखाली अमळनेर शिक्षण विभाग तालुकास्तरीय मूल्यवर्धन प्रशिक्षण कार्यक्रम प्रताप हायस्कूल अमळनेर या ठिकाणी उत्साहात संपन्न झाला. प्रशिक्षण वर्गामध्ये सुलभक,शिक्षक, शिक्षिका यांनी भाग घेतला यामध्ये विद्यार्थी कसा घडावा इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत सदर प्रशिक्षण कार्यक्रम तीन दिवसांपासून सुरू होता.सर्वात महत्वाचे शांतीलाल मुथा फाउंडेशन, पुणे यांच्या मार्फत आयोजित करण्यात आला होता.सोबत दररोज सुरूची भोजणाची मेजवानी होती.प्रशिक्षण वर्गामध्ये मध्ये,मनिष उघडे,गीतांजली घोरपडे, महाजन सर,किशोर अहिरराव,बापूराव ठाकरे ,विजय निकम, अमित निकम, सौ.मंगला सोनवणे सौ.योजना पाटील .सौ.पल्लवी पाटील मॅडम सौ.सुनैना अहिरे यांनी हिरेरीने भाग घेतला. सर प्रशिक्षणास या कार्यक्रमाच्या तालुका समन्वयक सौ.प्रगती माळी, विषय तज्ञ देवेंद्र पाटील, प्रमोद पाटील, आणि समाधान खैरनार , प्रभाकर शिरसाट योगेश पाटील दिनेश मोरे हे सुलभक लाभले. कार्यक्रम शेवटी सर्वांचा यथोचित सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बापूराव ठाकरे, सूत्रसंचालन आदरणीय डि.ए. धनगर सर यांनी केले आणि आभार प्रभाकर शिरसाठ यांनी मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *