चिंचदेवी यात्रेत सुषमाताई देसले यांची ठसठशीत उपस्थिती; महिला सक्षमीकरणाला दिला नवा मजबूत आवाज!”
1 min read

चिंचदेवी यात्रेत सुषमाताई देसले यांची ठसठशीत उपस्थिती; महिला सक्षमीकरणाला दिला नवा मजबूत आवाज!”

Loading

चिंचदेवी यात्रेत सुषमाताई देसले यांची  उपस्थिती; महिला सक्षमीकरणाला दिला नवा मजबूत आवाज!”

अमळनेर प्रतिनिधी :
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दक्ष, कार्यक्षम संचालिका तसेच लोकनियुक्त सरपंच सुषमाताई वासुदेव देसले यांनी दहिवद जिल्हा परिषद गटाच्या प्रचाराला दमदार सुरुवात केली आहे. कन्हेरे येथील ऐतिहासिक चिंचदेवी यात्रेनिमित्त त्यांनी दर्शन व आरती करून प्रभागातील नागरिकांचे आशीर्वाद घेतले.

यावेळी मिरवणुकीत उत्साहाने सहभागी होत त्यांनी ज्येष्ठ नागरिकांची मनापासून विचारपूस केली व त्यांच्या अडचणी, अपेक्षा नीट जाणून घेतल्या. उपस्थित नारीशक्तीशी विशेष संवाद साधत महिलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सक्षम, विश्वासार्ह आणि पारदर्शक योजनांची गरज त्यांनी अधोरेखित केली.
सुषमाताई देसले यांच्या नावाला दहिवद जिल्हा परिषद गटात महिला, पुरुष आणि तरुण वर्गाचा प्रचंड व वाढता पाठिंबा मिळत असून, महिलांसाठी त्यांनी केलेले सातत्यपूर्ण कार्य उल्लेखनीय ठरले आहे. बचतगट सशक्तीकरण, महिला रोजगार, स्वयंरोजगार प्रोत्साहन, आरोग्य सुविधा विस्तार आणि मुलींच्या शिक्षणासाठी घेतलेल्या उपक्रमांमुळे त्यांची छाप सर्वत्र दृढ होत आहे.
जिल्हा परिषद सदस्य पदाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाच्या अधिक प्रभावी योजना राबविण्याचे आश्वासन त्यांनी या ठिकाणी पुन्हा अधोरेखित केले. कन्हेरे परिसरातील नागरिकांकडून आणि महिला वर्गाकडून त्यांना मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता त्यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक चर्चा अधिक जोमात वाढत आहे.
दहिवद गटाच्या सर्वांगीण विकासासाठी “नियोजनबद्ध काम आणि लोकसहभाग” हेच आपले मूलभूत तत्त्व आहे, असे प्रतिपादन करत सुषमाताई देसले यांनी लोकांचा विश्वास जिंकण्याचा दृढ निर्धार व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *