सत्यशोधक विचारांचा नवा प्रकाश: विधवा मातोश्रींच्या हस्ते ‘शाहू इंटरप्राईजेस होम डेकोर’ चे उद्घाटन
![]()
सत्यशोधक विचारांचा नवा प्रकाश: विधवा मातोश्रींच्या हस्ते ‘शाहू इंटरप्राईजेस होम डेकोर’ चे उद्घाटन
धरणगाव/एरंडोल प्रतिनिधी – पी डी पाटील सर
धरणगाव : एरंडोल शहरात सामाजिक मूल्ये, सत्यशोधक विचार आणि मानवतावादी तत्त्वांची सांगड घालत, सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा उपाध्यक्ष सत्यशोधक कविराज दगडू पाटील यांनी स्थापन केलेल्या “शाहू इंटरप्राईजेस होम डेकोर” या दुकानाचे भव्य उद्घाटन पारंपारिक रूढींना फाटा देत अत्यंत हृदयस्पर्शी पद्धतीने झाले. विधवा मातोश्री पुष्पाबाई दगडू पाटील यांच्या हस्ते फीत कापून हा अभिनव उपक्रम समाजासमोर आदर्शवत ठरला. समाजातील मान्यवर, महिलाशक्ती आणि सत्यशोधक मार्गदर्शक यांच्यासमवेत महात्मा बळीराजा, पंढरीचा पांडुरंग, माँसाहेब जिजाऊ, संत तुकोब्बाराय, छ. शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीमाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारतीय संविधान प्रतिमांपुढे पूजन करून दुकानाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. पूजाविधी पाहुणे विजय देसले आणि बहीण अर्चना देसले यांच्या हस्ते करण्यात आला. सत्यशोधक पद्धतीने विधीकार्य शिवदास महाजन यांनी पार पाडले.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष रविंद्र महाजन, नायब तहसीलदार लक्ष्मणराव सातपुते, माहिती अधिकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष आबासाहेब राजेंद्र वाघ, सत्यशोधक संघाचे जिल्हाध्यक्ष पी.डी. पाटील, हेमंत माळी सर, व्याख्याते लक्ष्मणराव पाटील, गोरख देशमुख, मोहित पवार, सत्यशोधक संघाचे हिलाल महाजन, प्रल्हाद महाजन, दिनेश माळी, मनोज महाजन, रविंद्र महाजन, खुशाल महाजन, यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. तसेच कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळी यांची हजेरी लाभली.

