जिल्हास्तरीय महिला क्रिकेट स्पर्धेत सिस्टर निवेदिता शाळेचा संघप्राथक्रमकाने विजयी. *ओमकार इंटरनॅशनल स्कूल द्वितीय क्रमांक तर श्री वाणी विद्याशाळेने तृतीय क्रमांक पटकावला.*
![]()
जिल्हास्तरीय महिला क्रिकेट स्पर्धेत सिस्टर निवेदिता शाळेचा संघप्राथक्रमकाने विजयी.
*ओमकार इंटरनॅशनल स्कूल द्वितीय क्रमांक तर श्री वाणी विद्याशाळेने तृतीय क्रमांक पटकावला.*
ठाणे:कल्याण(मनिलाल शिंपी) कल्याण डोंबिवली महानगरपालिका मा.उपायुक्त आयुक्त, क्रीडा यांच्या आदेशानुसार
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे क्रीडापर्यवेक्षक प्रविण कांबळे साहेब यांचा निर्देशानुसार व खेळ प्रमुख म्हणून क्रीडा समिती सदस्य, के.एम.अग्रवाल कॉलेज चे क्रीडा संचालक डॉ विजय सिंग यांचा नेतृत्वाखाली, क्रीडा समिती सदस्य , श्री.वाणी विद्याशाळेचे पर्यवेक्षक व क्रीडा शिक्षक श्री.गजानन वाघ,एम.एल.म्हात्रे व्यवसायिक महाविद्यालयाचे क्रीडा संचालक,राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान विभागीय समन्वय अधिकारी (नोडल ऑफिसर) कामेंट्रेटर डॉ.मनिलाल शिंपी यांचा यांचा कल्याण डोंबिवली महानगर पालिका प्रमुख उपस्थितीत,कल्याण डोंबिवली महानगरपालिका
जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा 2025-26 चा नियोजनुसार मुलींची अंडर 17 वयोगटाची सिझन बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन युनियन क्रिकेट मैदान वायले नगर,खडकपाडा कल्याण पश्चिम येथे करण्यात आले होते.शालेय शासकीय जिल्हास्तरीय महिला क्रिकेट स्पर्धेत सिस्टर निवेदिता शाळेचा संघ प्रथम क्रमांकाने विजयी.
ओमकार इंटरनॅशनल स्कूल द्वितीय क्रमांक तर श्री वाणी विद्याशाळेने तृतीय क्रमांक पटकावला.
डोंबिवली पूर्वेतील सिस्टर निवेदिता शाळेच्या १७ वर्ष वयोगटातील मुलींच्या क्रिकेट संघाने अतिशय उत्कृष्ट फलंदाजी व गोलंदाजी करत अंतिम सामन्यात धडक मारली व त्याच जोमाने ओमकार इंटरनॅशनल शाळेचा मुलींचा क्रिकेट संघानेही अंतिम सामन्यात प्रवेश केला . व या दोन्ही संघात फायनलसाठी अत्यंत चुरस निर्माण झाली.परंतु सिस्टर निवेदिता संघाचा अचूक गोलंदाजीपुढे ओमकार इंटरनॅशनल शाळेचा मुलींचा क्रिकेट संघाचा फलंदाजांना फेकबाजी करता आली नाही, व अत्यंत कमी धावसंख्या उभारता आली.त्या धावांचे ध्येय सहज पूर्ण करत जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत सिस्टर निवेदिता शाळेने प्रथम क्रमांक पटकावला. ओमकार इंटरनॅशनल शाळेचा मुलींचा क्रिकेट संघ दुसऱ्या क्रमांक मिळवला. श्री वाणी विद्याशाळेचा मुलींचा क्रिकेट संघाचा तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले.
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी, वाणी विद्याशाळेचे क्रीडा शिक्षक आतिश ठाणगे, डॉनबॉस्को शाळेचे क्रीडा शिक्षक अमोल सर, कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्रीडा स्पर्धांमध्ये संयुक्तपणे विशेष व मोलाचे योगदान देणारे श्री.अनिकेत वानखेडे यांनी स्कोअर बोर्ड काटेकोरपणे सांभाळण्याची जबाबदारी निभावली.सौ.राजश्री वानखेडे व अनिकेत वानखेडे यांचा हस्ते विजयी संघाचे ट्रॉफी देऊन अभिनंदन करण्यात आले.

