ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात मेमरी टेक्निक वर कार्यशाळा*
![]()
*ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात मेमरी टेक्निक वर कार्यशाळा*
के.सी.ई. सोसायटी संचालित ए.टी झांबरे माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांच्या मेमरी टेक्निक वर कार्यशाळा घेण्यात आली. ही कार्यशाळा आय एम आर कॉलेज चे प्राध्यापक सुनील विसपुते आणि प्राध्यापक विजय जोशी यांनी घेतली.
*चेंज युवर हॅबिट्स चेंज युवर लाईफ* हा कानमंत्र देत विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची आवड वेगवेगळ्या टेक्निक च्या माध्यमातून कशी निर्माण करता येऊ शकते याची प्रत्यक्ष कृती विद्यार्थ्यांकडून करून घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
अभ्यास समजून घेऊन लक्षात कसा ठेवायचा तसेच त्या अभ्यासाच्या आधारावर अभ्यासाच्या इतर पद्धती आणि लेखन कौशल्य, भाषिक कौशल्य कशाप्रकारे विकसित करायचे याचेही मार्गदर्शन प्राध्यापक सुनील विसपुते यांनी केले.
हीकार्यशाळा इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली.
शाळेचे मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले
कार्यशाळेसाठी स्मिता शेंडगे अनिल शिवदे यांनी सहकार्य केले.

