*महाराष्ट्रातील 118 विद्यार्थ्यांची इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड*    *नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेतील जाणार इस्रो, आयआयटी भेटीला*  *कोल्हापूरचा शंतनू येडगे अआणि नाशिकची  देवांशी देवरे राज्यात अ गटात प्रथम, पुण्याचे स्नेहल ठोंबरे ब गटात प्रथम*
1 min read

*महाराष्ट्रातील 118 विद्यार्थ्यांची इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड* *नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेतील जाणार इस्रो, आयआयटी भेटीला* *कोल्हापूरचा शंतनू येडगे अआणि नाशिकची देवांशी देवरे राज्यात अ गटात प्रथम, पुण्याचे स्नेहल ठोंबरे ब गटात प्रथम*

Loading

 

*महाराष्ट्रातील 118 विद्यार्थ्यांची इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड*

*नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेतील जाणार इस्रो, आयआयटी भेटीला*

*कोल्हापूरचा शंतनू येडगे अआणि नाशिकची देवांशी देवरे राज्यात अ गटात प्रथम, पुण्याचे स्नेहल ठोंबरे ब गटात प्रथम*

 

जळगांव प्रतिनिधी- नोबेल विज्ञान प्रसारक बहुउद्देशीय संस्था, भवरलाल अंड कांताबाई जैन फाउंडेशन तर्फे दरवर्षी नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेचे आयोजन इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी केले जाते. या परीक्षेतील गुणवत्ता यादीत आलेल्या तब्बल 118 विद्यार्थ्यांना यावर्षी इस्रोची सफर घडणार आहे. गणित, विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयावर आधारित स्पर्धा परीक्षेतून सदर विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आलेली आहे. सदर विद्यार्थी जानेवारी महिन्यात इसरो आयआयटी सायन्स सिटी आयआयएम या शिक्षण व तंत्रज्ञान संस्थांना भेट देणार आहेत.
या परीक्षेत अ गटातून इयत्ता पाचवी आराध्य प्रसाद रानडे (अकोला), तर सहावीत देवांशी पद्माकर देवरे (नाशिक) आणि शंतनू मिलिंद येडगे (कराड जि. सातारा) हा सातवी वर्गात राज्यात प्रथम आलेले आहेत. तर शरविल विशाल वाणी इयत्ता पाचवी (नाशिक), शिवम पाचलिंग (परभणी) सहावी, शरविल खोपडे (कोल्हापूर) इयत्ता सातवी मध्ये राज्यात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहेत.
तसेच ब गटातून पुणे येथील स्नेहल ठोंबरे इयत्ता आठवी,धैर्यशील धनंजय दाभाडे इ.नववी तर अमेय हरिश्चंद्र जाधव( बोरावडे जि.कोल्हापूर) इयत्ता दहावी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. तर दीपक वीर पुणे (आठवी), राजवीर भुंजे(नववी),सोहम लोया कोल्हापूर (दहावी),गोकर्ण महाजन(दहावी) राज्यात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.
नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेचे हे नववे वर्ष आहे. आजपर्यंत या परीक्षेच्या माध्यमातून आठशे हुन अधिक विद्यार्थ्यांनी इस्रो भेटीचा आनंद घेतलेला आहे. याला विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील महाराष्ट्रातील क्रांती म्हणावी लागेल. या सर्व विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल त्यांच्या पंचक्रोशीत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येत आहे.
मागील वर्षी नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षा ऑनलाईन पद्धत आणि प्रत्यक्ष पेपर पद्धतीने संपन्न झाली. तसेच गुणवत्ता यादीतील 400 हून अधिक विद्यार्थ्यांच्या मुलाखती संपन्न झाल्या याद्वारे 118 विद्यार्थ्यांची इस्रो, आयआयटी, आयआयएम,सायन्स सिटी अभ्यास दौऱ्यासाठी निवड केलेली आहे.
. सदर विद्यार्थी जानेवारी महिन्यात विक्रम साराभाई स्पेस सेंटर अहमदाबाद, आयआयटी गांधीनगर, आयआयएम अहमदाबाद सायन्स सिटी अहमदाबाद फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी अहमदाबाद इत्यादी ठिकाणी अभ्यास दौऱ्यासाठी जाणार आहेत. अशी माहिती नोबेल फाउंडेशनचे संचालक जयदीप पाटील यांनी दिली.
“महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून शेकडो विद्यार्थी इस्रो आयआयटीपर्यंत जाणे ही समाजातील मोठी क्रांती नोबेल फाउंडेशनच्या कामामुळे घडत आहे. याच विद्यार्थ्यांमधून भविष्यातील नोबेल पुरस्कार विजेते भारतीय घडतील याची खात्री आहे.” अशी भावना नोबेल फाउंडेशनचे संचालक जयदीप पाटील यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *