अमळनेरात शिवसेनेचा शक्तीप्रदर्शन मेळावा — अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!
1 min read

अमळनेरात शिवसेनेचा शक्तीप्रदर्शन मेळावा — अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!

Loading

अमळनेरात शिवसेनेचा शक्तीप्रदर्शन मेळावा — अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!

अमळनेर प्रतिनिधी : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा विजयी झेंडा प्रत्येक ठिकाणी रोवला जावा, शिवसेना घराघरात पोहचून पक्षाला बळकटी मिळावी या उद्देशाने दि. २६ रोजी लाडशाखीय वाणी मंगल कार्यालयात शिवसेनेचा मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला.
मेळाव्याचे अध्यक्ष जिल्हा प्रमुख वासुदेव पाटील होते. यावेळी माजी आमदार शिरीष चौधरी आणि ऍड. ललिता पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याबद्दल शिवसेना पदाधिकाऱ्यांतर्फे शिवप्रतिमा देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर युवा सेना जिल्हा प्रमुख रोहित कोगटा, तालुका प्रमुख सुरेश अर्जुन पाटील, शहर प्रमुख संजय कौतिक पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख रवींद्र पाटील, माजी तालुका प्रमुख प्रथमेश पवार, माजी नगरसेवक अनिल महाजन, गुलाब पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुनील भामरे, पंकज चौधरी, बाळासाहेब संदानशिव, श्रीराम चौधरी, महिला आघाडी शहर प्रमुख चित्रलेखा महाजन, भूषण कोळी, नरेंद्र पाटील, तालुका संघटक गजेंद्र जाधव, प्रसिद्धी प्रमुख अनिल पवार, व्यापारी सेना शहर प्रमुख अमित ललवाणी, तुषार पाटील, दीपक हटवाल, विजय साळुंखे, शोएब शेख पठाण, सुभाष यादव, संतोष पाटील, रिजवान खान, चंद्रशेखर गुजर, रामचंद्र पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी मा. आ. शिरीष चौधरी, जिल्हा प्रमुख वासुदेव पाटील, सुरेश अर्जुन पाटील, ऍड. ललिता पाटील, गुलाब पाटील, रोहित कोगटा यांनी मनोगतातून शिवसेना वाढीसाठी प्रत्येक कार्यकर्त्याने एकजुटीने कार्य करायला पाहिजे जेणेकरून आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेचा झेंडा प्रत्येक ठिकाणी रोवला जाईल, असे आवाहन केले.
यावेळी सात्रीच्या महिला कार्यकर्त्या ललिता जगदीश सोनवणे, गांधलीपुराच्या
रेखा विक्रम गोयर, ताडेपुराच्या योगिता आकाश पवार यांच्या समवेत जुनोने, पाडळसरे, रंजाने, जळोड, सोनखेडी, रामेश्वर, देशमुख वाडा आदी परिसरातील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
मेळाव्याचे सूत्रसंचालन उपशहर प्रमुख प्रवीण पाटील यांनी केले.
मेळाव्यात तालुक्यातील शिवसेनेचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *