डॉ.शिवचरण उज्जैनकर यांना पद्मश्री मणिभाई देसाई मानव सेवा ट्रस्टचा भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हिंदू रत्न पुरस्कार जाहीर*  *दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी पुणे येथे होणार सन्मान*
1 min read

डॉ.शिवचरण उज्जैनकर यांना पद्मश्री मणिभाई देसाई मानव सेवा ट्रस्टचा भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हिंदू रत्न पुरस्कार जाहीर* *दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी पुणे येथे होणार सन्मान*

Loading

*डॉ.शिवचरण उज्जैनकर यांना पद्मश्री मणिभाई देसाई मानव सेवा ट्रस्टचा भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हिंदू रत्न पुरस्कार जाहीर*

*दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी पुणे येथे होणार सन्मान*

जळगांव प्रतिनिधी

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा नवीन माध्यमिक विद्यालय, पारंबी तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव येथील ज्येष्ठ शिक्षक डॉ.शिवचरण उज्जैनकर यांना पद्मश्री मनीभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट पुणेचा भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हिंदू रत्न पुरस्कार नुकताच या संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ समाजसेवक तथा प्रवचनकार डॉ.रवींद्र भोळे यांनी डॉ.उज्जैनकर यांना नुकतेच निवड पत्र पाठवून जाहीर केला. हा पुरस्कार त्यांना 31 ऑक्टोबर 2025 रोजी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्या नगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील तसेच मॅगसेसे पुरस्कार विजेत्या पद्मश्री निलिमाताई मिश्रा आणि पुणे जिल्ह्याच्या खासदार सौ.मेधाताई कुलकर्णी यांच्या शुभहस्ते दिला जाणार आहे. डॉ.शिवचरण उज्जैनकर हे गेल्या 25 वर्षापासून शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, कला, आरोग्य, कृषी व पर्यावरण क्षेत्रामध्ये नेत्रदीपक कार्य करत आहेत डॉ.उज्जैनकर यांचे कार्य पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि गोवा राज्यामध्ये सुद्धा सुपरिचित आहे ते दरवर्षी दोन मराठी साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन करत आहेत एक राज्यस्तरीय शिव बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन आणि दुसरे अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलन त्यांनी आत्तापर्यंत कुऱ्हा काकोडा, मुक्ताईनगर जिल्हा जळगाव,पन्हाळा गड जिल्हा कोल्हापूर, खामगाव जिल्हा बुलढाणा, अमरावती, आळंदी देवाची जिल्हा पुणे आणि बोरी, फोंडा गोवा राज्यामध्ये सुद्धा त्यांनी मराठी भाषा प्रचार व प्रसारासाठी साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन केलेले आहे 31 जानेवारी 2026 रोजी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथे उज्जैनकर फाउंडेशनचे चौथे अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे ते नवीन माध्यमिक विद्यालय पारंबी तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव येथे गेल्या 27 वर्षापासून आदर्श व उपक्रमशील शिक्षक म्हणून कार्यरत आहेत डॉ.उज्जैनकर यांनी आतापर्यंत हजारच्या वर विद्यार्थ्यांना सन्मानित केलेले असून हजारच्या वर शिक्षक, प्राचार्य, मुख्याध्यापक,पत्रकार, समाजसेवक, निवेदक, वक्ता आणि लेखक ,कवी, साहित्यिकांना सुद्धा तापी. पूर्णा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केलेले आहे डॉ.उज्जैनकर यांना हा सर्वश्रेष्ठ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तसेच गोवा राज्यातील पदाधिकारी तसेच त्यांच्या नवीन माध्यमिक विद्यालय, पारंबी येथील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी डॉ.शिवचरण उज्जैनकर यांचे अभिनंदन केलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *